महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे मतदान आहे. कागल गडहिंग्लज उत्तुर मतदार संघात परिवर्तन घडवण्यामध्ये महिलाच आघाडीवर असतील. क्रांतिकारी निर्णय घेण्यामध्ये आजच्या महिला आघाडीवर आहेत.” असा विश्वास राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले.
मुगळी येथे परिवर्तन संकल्प दौऱ्या प्रसंगी त्या बोलत होत्या. नवोदिता घाटगे म्हणाल्या,‘ जिजाऊ महिला समितीतर्फे महिलांसाठी आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत. महिलांचे आरोग्य सुस्थितीत राहावे यासाठी प्रयत्न करत आहोत. महिलासाठी काही ठिकाणी आरोग्य कॅम्पचे आम्ही आयोजन केले होते. समाजसेवा हे आमच्या घराण्याची संस्कार आहेत पुढेही असेच कार्य करण्यासाठी, व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा व विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी ताकतीने समरजितराजेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. त्यांना मतदान करून हे परिवर्तन महिला नक्कीच करतील .” याप्रसंगी सरपंच मेघा पाटील, रंजना गुरव, रूपाली पाटील, अंबुताई येजरे,पमाताई कांबळे ,लता सांगले, समिंदरा लुगडे, माया सांगले राणी नाईक, वंदना सांगले,रंजना पवार यांचेसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी जैन्याळ, बेलेवाडी मासा,बोरवडे ,उंदरवाडी निढोरी येथे परिवर्तन संकल्प मेळाव्यास महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.