हातकणंगलेच्या राजकारणात ट्विस्ट, राहुल आवाडे मैदानात ?
schedule28 Mar 24 person by visibility 692 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट तयार झाला आहे. महायुतीमधून अद्याप उमेदवार निश्चित झाला नाही. दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्याचा आवाडे गटाने निर्धार केला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे निवडणूक लढविण्याच्या पावित्र्यात आहेत.लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आवाडे गटाची कोल्हापुरात गुरुवारी , २८ मार्च रोजी महत्वाची बैठक होत आहे. आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे बैठकीला उपस्थित राहणार आहेत.आमदार प्रकाश आवाडे हे गेले चार वर्षे भारतीय जनता पक्षासोबत आहेत.