इंडिया आघाडीतर्फे रविवारी दसरा चौक ते माणगावपर्यंत सन्मान बाइक रॅली
schedule26 Dec 24 person by visibility 37 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीतर्फे २९ डिसेंबर २०२४ रोजी दसरा ते माणगाव दरम्यान सन्मान बाइक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या तयारीसाठी इंडिया आघाडीची बैठक झाली.
निमंत्रक आर.के. पवार हे होते. आर के पोवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार शाहू महाराज छत्रपती व काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात येणार आहे. सन्मान रॅलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून जास्तीत जास्त संख्येने मोटारसायकली सामील झाल्या पाहिजेत यादृष्टीने नियोजन करण्याचे ठरले. रविवारी, २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता मोटार सायकली सह उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले. रॅलीच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अकरा फूट उंचीचा पुतळा असणार आहे. माणगाव येथे रॅलीचा समारोप होईल.
दरम्यान आढावा बैठकीला विजय देवणे, सचिन चव्हाण, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, कॉम्रेड उदय नारकर, सुनील मोदी, व्यंकाप्पा भोसले, कॉ सुभाष जाधव, डी.जी. भास्कर चंद्रकांत यादव, दिगंबर लोहार, भरत रसाळे, सुभाष बुचडे, मोहन सालपे, संभाजी जगदाळे, दिलदार मुजावर, अरुण कदम, रंगराव देवणे, आकाश शेलार, रणजीत पवार, बबन शिंदे, बाळासाहेब भोसले, अनिल घाटगे, सुभाष देसाई, दुर्वास कदम,विशाल देवकुळे, मंजीत माने, उपस्थित होते.