शिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हॅटिट्रक
schedule26 Dec 24 person by visibility 123 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : डी वाय पाटील मेडिकल कॉलेज येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेमध्ये दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या महिला क्रिकेट संघाने सांगली, सातारा व कोल्हापूर संघाबरोबर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
२०२२-२३, २०२३-२४ आणि या वर्षी २०२४-२५ असे सलग तिसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेता श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मुलींचा संघ ठरला. या स्पर्धेमध्ये कर्णधार सौम्यलता बिराजदार, उपकर्णधार सानिका लाड, स्नेहा साळे, सिद्धी चव्हाण व साक्षी पाटील यांनी चमकदार कामगिरी केली. त्यांची निवड उदयपूर येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी झाली.
सर्व विजेत्या खेळाडूंना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, संस्थेचे रजिस्ट्रार रुपेश खांडेकर, प्राचार्य डॉ. आर के. शानेदिवाण, रजिस्ट्रार रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, जिमखाना प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, क्रीडा शिक्षक प्रा. प्रशांत मोटे, प्रशिक्षक सरदार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.