Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवसेनेतर्फे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन, नूतन नगरसेवकांचा सत्कार क्रीडाई कोल्हापूरतर्फे तीस जानेवारीपासून चार दिवसीय दालन प्रदर्शन ! वास्तू विषयक १७० स्टॉल्सचा समावेश ! !भाजपकडून शिराळे, खाडे, देसाई, कुंभारांची नावे चर्चेत ! शिवसेनेचाही महापौरपदावर दावा !!कोल्हापूर - इचलकरंजी महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव !जिल्हा परिषदेची निवडणूक, कार्यकर्त्यांच्या सन्मानाची ! कार्यकर्त्यांना पद, राजकारणात मोठं करणं हा महाडिक पॅटर्न ! !भाजपकडून जिपसाठी ४१, पंचायत समितीसाठी ७२ उमेदवार ! काही तालुक्यात स्वतंत्र, काही ठिकाणी युती! !शु्क्रवारी शाळा सकाळी भरणारगडहिंग्लज-चंदगड -आजरा तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, घडयाळ चिन्हावर लढणारकळंब्यात राजकीय घडामोडी ! काँग्रेसचे भोगम भाजपात, विनिता भोगमना जिल्हा परिषदेची उमेदवारी!!डॉ. जे. के. पवार लिखित अमृतमहोत्सवी भारत ग्रंथाचे प्रकाशन

जाहिरात

 

सरकारी कर्मचाऱ्यांचा घुमला नारा ! एकच मिशन-जुनी पेन्शन !!

schedule21 Sep 22 person by visibility 6061 categoryजिल्हा परिषद

जुनी पेन्शन योजनेसाठी हजारो सरकारी कर्मचारी रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक मोर्चा  महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "हम सब एक है एकच मिशन जुनी पेन्शन कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, हमारी युनियन हमारी ताकत " अशा घोषणा देत सरकारी कर्मचारी बुधवारी 21 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात रस्त्यावर उतरले. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बाईक मोर्चा काढला. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवतिके यांना निवेदन दिले. गेली सतरा वर्ष हा लढा सुरू आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास  कर्मचारी बेमुदत संप पुकारण्याच्या पावित्र्यात आहेत. त्या संपात नवीन कर्मचाऱ्यासह जुने कर्मचारी सहभागी होतील असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर यांनी दिला. 
राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्काचे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन पुकारले होते. नवीन पेन्शन योजना एनपीएस कर्मचाऱ्यांच्या हिताचे नाही एमपीएससी अंतर्गत मिळणारे लाभाचे स्वरूप शाश्वती न देणारे आहेत त्यामुळे एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी ते कर्मचाऱ्यांच्या हिताचे आहे राजस्थान छत्तीसगढ गोवा या राजाने जुनी पेन्शन योजना लागू केली आहे महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा मागण्या करत कर्मचारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रस्त्यावर उतरले.   एकच मिशन जुनी पेन्शन असा मजकूर लिहिलेल्या टोप्या परिधान करून बाईक रॅली काढण्यात आली दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गावरून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचली. अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. जिल्हा शाखाध्यक्ष वसंत डावरे, संजय क्षीरसागर, हाशमत हावेरी, संजीवनी दळवी, राजू गंधवाले, सुनील देसाई सतीश ढेकळे, नंदकुमार इंगवले, विठ्ठल वेलणकर, सुधाकर भादिंगरे, अनिल खोत, संदीप नलावडे, अखिल शेख धोंडीराम चव्हाण, गणेश तासगावकर, योगेश यादव, गव्हर्नमेंट बँकेचे रमेश घाटगे, संचालक विलास कुरणे,  प्रकाश पाटील, संजय खोत,  मनुजा रेनके,पल्लवी रेणके, शिक्षक बँकेचे संचालक सुनील एडके, शरद केनवडे, शिक्षक संघटनेचे सुधाकर सावंत उमेश देसाई, संजय पाटील, करण सरनोबत, मंगेश धनवडे, कर्मचारी संघटनेचे नंदकुमार इंगवले, राजू आंबेकर, रमेश भोसले, बी.एस.खोत, उदय लांबोरेे, रामचंद्र रेवढे, सुनील देसाई, धोंडीराम चव्हाण, जयदीप कांबळेे, संतोष पांगम, गणेश आसगावकर, श्रीमंतिनी पाटील, विनोदकुमार भोंग यांचा समावेश होता.  राज्य संघटक अनिल लवकर म्हणाले, आंंदोलनातत १००० पेक्षा जास्त बाईकस्वारांचा सहभाग होता .मध्यवर्ती संघटनेच्या रॅलीत महत्वाच्या संघटना सहभागी झाल्या. यामध्ये जुनी पेन्शन योजना हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक समाती, प्राथमिक शाक्षक संघ, खाजगी प्राथमिक शिक्षक समिती, खाजगी प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, माजी सैनिक संघटना यांचा समावेश आहे.मध्यवर्ती संघटनेच्या ६२ वर्षाच्या इतिहासात प्रथमच बाईक रॅली, तसेच "सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करा " या एकमेव विषयासाठी आंदोलन झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes