मुख्याध्यापक संघाची निवडणूक बिनविरोध ! अध्यक्षपदी राहुल पोवार, उपाध्यक्षपदी मिलिंद पांगिरेकर, रविंद्र मोरे !!
schedule31 Mar 24 person by visibility 726 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची निवडणूक बिनविरोध झाली. मुख्याध्यापक संघाच्या निवडणुकीसाठी मोठया संख्येने अर्ज दाखल झाले होते. दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार मुख्याध्यापक संघाच्या बिनविरोधाचा प्रस्ताव तयार झाला. सत्ताधारी व विरोधी आघाडीने तो मान्य केला. रविवारी, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रयत्नांना यश आले. मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकारी व संचालकांच्या जागा व्यतिरिक्त इतर अर्ज मागे संबंधितांनी मागे घेतले. दरम्यान बिनविरोधाची यादी तयार करताना शेवटपर्यंत कसरत करावी लागली.
शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या गटाला बारा तर शाळा कृती समितीचे बाबा पाटील यांच्या गटाला अकरा जागा मिळाला. लाड यांच्या गटाकडे अध्यक्ष, सचिव व खजानिसपद आहे. तर पाटील यांच्या गटाकडे उपाध्यक्ष व सहसचिवपद आहे. मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी राहूल दत्ताजीराव पोवार (पडळ हायस्कूल पडळ)_यांची निवड झाली. पोवार हे लाड गटाचे आहेत. तर उपाध्यक्षपदी मिलिंद भीमराव पांगिरेकर ( गारगोटी हायस्कूल गारगोटी)_, रविंद्र यशवंत पाटील (चेन्निशेट्टी हायस्कूल निगवे)_ यांची निवड झाली. सचिवपदी राजेंद्र यशवंत पाटील (आदर्श प्रशाला कोल्हापूर), सहसचिवपदी श्रीकांत हरी पाटील (ज्ञानराज माध्यमिक विद्यालय सावर्डे) यांची निवड झाली. खजानिसपदाची जबाबदारी सागर कुमार चुडाप्पा (खोतवाडी हायस्कूल खोतवाडी) यांच्याकडे सोपविली.
सदस्यपदी जयसिंग ज्ञानदेव पाटील भैरवनाथ हायस्कूल बडयाचीवाडी, रामचंद्र कृष्णा शिंदे रामलिंग हायस्कूल नूल, संजय श्रीपतीदेवेकर दाभिल हायस्कूल दाभिल, सुनील महादेव पाटील हलकर्णी हायस्कूल हलकर्णी, पांडूरंग बयाजी भारमल म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे, निशिकांत जयसिंगराव चव्हाण कुमारभवन पुष्पनगर शाळा, गणपती शंकर पाटील इंदिरा गांधी हायस्कूल सरुड, आनंदा दगडू वारंग श्री निनाई माध्यमिक विद्यालय करुगळे शाहूवाडी, माजिद अब्दुल राशीद पटेल ऊर्दू हायस्कूल आलास, हेमंत भूपाल धनवडे पंचशील हायस्कूल शहापूर, साताप्पा कृष्णा पाटील माध्यमिक विद्यालय तुरंबे, युवराज आनंदराव पाटील माध्यमिक विद्यालल शेळोशी, बसवराज चन्नया वस्त्रद दादासाहेब मगदूम हायस्कूल कोल्हापूर, महादेव गुंडा पाटील भैरवनाथ हायस्कूल वरणगे, दामोदर शामराव एरुडकर माध्यमिक विद्यालय फेजिवडे, मनिषा गुरुप्रसाद यादव माध्यमिक विद्यालय पेठवडगाव, हर्षदा हेमंत गोसावी गर्ल्स हायस्कूल शिवाजी पेठ कोल्हापूर यांचा समावेश आहे.
मुख्याध्यापक संघाची निवडणूक यंदा सत्ताधारी आणि विरोधी आघाडीने प्रतिष्ठेची केली होती. आरोप, प्रत्यारोप झाले होते. दोन्ही आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. दरम्यान बिनविरोधासाठी प्रयत्न सुरू होते. आमदार पाटील यांच्या सूचनेनुसार खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे नेते भरत रसाळे यांनी दोन्ही आघाडीच्या शिक्षक नेत्यासोबत चर्चा केली. दोन्ही आघाडयांनी प्रतिसाद दिल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान दोन्ही आघाडयांनी गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेक मुख्याध्यापकांना संघाच्या निवडणुकीत संधी दिली जाईल असे सांगितले होते. मात्र निवडणूक बिनविरोध झाली. काहींना संधी मिळाली नाही यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी नाराजी नाट्य घडले.