+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही हे शाहू महाराजांनी दाखवून दिले-कपिल पाटील adjust आमदार प्रकाश आवाडे निवडणूक लढवणार, हातकणंगलेत अपक्ष उमेदवारी adjustगोकुळमार्फत सतेज पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा adjustशिक्षक बँकेतील राजकारणाचे कवित्व ! एकमेकांच्या कामकाजाचा पर्दाफाश ! adjustगोकुळच्या दूध विक्रीचा नवा उच्चांक ! दिवसभरात २२ लाख ३१ हजार लिटर दूध विक्री adjustरोटरी गार्गीजतर्फे सोळा एप्रिलला भरतनाट्यम कार्यक्रम adjustसभेच्या मान्यतेने अमृत संजीवनी योजना, विक्रमी नफ्यामुळे विरोधकांना पोटशूळ- अध्यक्ष राजेंद्र पाटील adjustनिवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा-हसन मुश्रीफ adjustशक्तिपीठ महामार्ग धनदांडग्यासाठी, शेतकऱ्यांची बैलगाडी त्यावर धावणार का ? - संजय घाटगे adjustटेंबलाईवाडी विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार - जिल्हाधिकारीसो अमोल येडगे
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Mar 24 person by visibility 214 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर घडामोडी वेगावल्या आहेत. खासदार मंडलिक यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भेट घेतली. दुसरीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला.
  याप्रसंगी भाषणात संजय मंडलिक म्हणाले, रात्री उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज सकाळीच करवीर निवासिनी श्री. अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो. यावेळी महाडिक मला म्हणाले, तुझ्यासोबत पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत, त्यांना धरून रहा. मग काळजीच करू नको, तुझा विजय निश्चित आहे.’
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी काम केले. त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी प्रा. संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करू या. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचा प्रमुख म्हणून ही जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू.’
 ्प्रा. मंडलिक म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापुरात विमानतळ, दळणवळण, रेल्वे या महत्त्वाच्या सेवा- सुविधा यांचे आधुनिकीकरण करण्यात यश मिळाले. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे आम्हा सर्वांनाच आणि व्यक्तीशः मलाही आदरणीयच आहेत. माझी लढाई त्यांच्याशी नाही. माझे- त्यांचे वैयक्तिक संबंध फार चांगले आहेत. शेवटपर्यंत आपण निवडणुकीसाठी उभारणार नाही, असेच ते मला सांगत होते. परंतु; संधीसाधूनी मुद्दामहून त्यांना उभं केलयं. कोल्हापूरच्या गादीचा जरूर मान- सन्मान ठेवूया. परंतु; कोल्हापूरकर म्हणून आमचाही आत्मसन्मान आहे.
 कोल्हापूर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदिल फरास म्हणाले, मंत्री मुश्रीफ , या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका आता तुम्हालाच पार पाडून निवडणूक जिंकावी लागेल. यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, मी सुदर्शन चक्र कुठून आणू ? त्यावर आदिल फरास म्हणाले, ते तर तुमच्या हातातच आहे.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप माने, राष्ट्रवादीच्या युवती शहराध्यक्षा पूजा साळोखे, फिरोज सौदागर, रामेश्वर पत्की, प्रसाद उगवे, जहीदा मुजावर यांची भाषणे झाली.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्ष श्रीमती रेखा आवळे, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी नगरसेवक  रमेश पोवार, राजेश लाटकर, प्रकाश गवंडी, संदीप कवाळे, प्रकाश पाटील, प्रकाश कुंभार, सतीश लोळगे, संभाजीराव देवणे, शारदा देवणे, राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष महेंद्र चव्हाण उपस्थित होते. माजी नगरसेवक महेश सावतं यांनी आभार मानले.