शक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार आंदोलन, तीन तास राष्ट्रीय महामार्ग ठप्प
schedule01 Jul 25 person by visibility 266 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलन झाले. एक जुलै रोजी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पुलावर जवळपास तीन तास आंदोलन करत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली. सकाळी दहा ते दुपारी एक या आंदोलन वेळेत या महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. आंदोलनानंतर बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनीचे वाटोळे करू देणार नाही असा दम भरला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सद्बुद्धी मिळू दे, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे याकरिता चार जुलै रोजी पंढरपूर येथे पांडुरंगाला साकडे घालणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै रोजी राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन पुकारले होते. सकाळी दहा वाजता बाधित शेतकरी विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते पंचगंगा नदी पुलावर एकत्र आले. " शेती आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची ! शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, शेती वाचवा देश वाचवा" अशा घोषणा देत राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. माजी खासदार शेट्टी माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू आवळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब देवकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुरेश चौगुले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्यांणवर, जयकुमार कोल्हे, तानाजी धनवडे, राम शिंदे, सचिन शिंदे, विक्रम पाटील, स्वस्तिक पाटील, राहुल देसाई, अजित पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार, शिक्षक नेते भरत रसाळे आदींच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली. " शेती वाचवा देश वाचवा" असा मजकूर लिहिलेल्या टोप्या साऱ्यांनी परिधान केल्या होत्या. याप्रसंगी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. साऱ्यांनीच शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला धारेवर धरले. शक्तीपीठ महामार्गाची गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी लबाडण्याचा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांच्या सोबत सामान्य नागरिक ही शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतीपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार साऱ्यांनी व्यक्त केला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्यात आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. माजी खासदार शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या जमिनी संपुष्टात आणण्याचा प्रकार आहे. मुळात या महामार्गाची गरज नाही. सध्या रस्ते प्रशस्त आहेत. शक्तिपीठ महामार्ग अंतर्गत येरळा, कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती, कासारी या नदीपात्रात ठिकठिकाणी भरावा पडणार आहे. काही ठिकाणी पुलाचे बांधकाम होणार आहेत. त्यामुळे महापराचे पाणी साचणार आहे. माणगाव - पट्टणकोडोली दरम्यानचा पूल झाला तर महापुराचे पाणी बिंदू चौकापर्यंत पोहोचेल. सरकारने शक्तिपीठ महामार्ग हा प्रतिष्ठेचा विषय करू नये. शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकासाला विरोध असे समजू नये. ड्रोनद्वारे शेत जमिनीची मोजणी करण्यास कोणी आले तर गोफनद्वारे ड्रोन फोडू" असेही शेट्टी यांनी बजावले. आंदोलनात डाव्या चळवळीतील सतीश कांबळे, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, इरिगेशन फेडरेशनचे मारुती पाटील, काँग्रेसचे कागल तालुका अध्यक्ष सागर कोंडेकर, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, चंद्रकांत सूर्यवंशी, विनायक घोरपडे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम, राष्ट्रवादीचे गणेश जाधव, पाचगावचे माजी उपसरपंच प्रकाश गाडगीळ, संजय शिंदे, युवराज गवळी, सुभाष देसाई यांच्यासह बाधित शेतकरी नागरिक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. आंद्राणामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय होती. महिला शेतकरी सुद्धा आंदोलनात सक्रिय होत्या. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ही आंदोलनात सहभागी होते. आंदोलना दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी हजर होते. दुपारी एक नंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाली.