+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात रविवारी गुरुवंदना महोत्सव adjustगावात नो डॉल्बी, नो डिजीटल फलक ! शांतता-सामाजिक सलोख्याचा माणगाव पॅटर्न !! adjustन्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४९ टक्के adjustकोल्हापुरातील १९० शाळांना मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ adjustजिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी, पुरोगामीचे ग्रामविकासला निवेदन adjustनिधी खर्चावर सीईओंचे लक्ष, अधिकाऱ्यांना सक्त सूचना ! adjustगोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश adjustशिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव करण्यासाठी स्वयंसेवकानी वज्रमूठ बांधावी-संभाजीराजे छत्रपती adjust टेनिस स्पर्धेत वरद पोळचा मानांकित खेळाडूवर विजय adjustविवेकानंदमध्ये बारावीतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Mar 23 person by visibility 337 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून २९ मार्च ते दोन एप्रिल २०२३ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनिल साळोखे यांच्या पुढाकारातून विविध ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत.
 बुधवारी (२९ मार्च) सकाळी साडेआठ वाजता गडमुडशिंगी मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. गुरुवारी (30 मार्च) सकाळी नऊ वाजता गडमुडशिंगीचे ग्रामदेव बिरदेव मंदिर येथे महाआरती आहे. सकाळी साडेदहा वाजता हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप तर दुपारी दीड वाजता दत्त भिक्षालिंग मंदिर येथे ब्लँकेट वाटप येणार आहे. दुपारी चार वाजता पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ येथे डवरी समाजातील गरजूंना  ब्लँकेट वाटप आहे. सायंकाळी सहा वाजता मल्हार पेठ सावर्डे येथील गोपाळ समाजातील गरीब मुलांना कपडे वाटप होणार आहे. शुक्रवारी (३१  मार्च) सकाळी साडेनऊ वाजता वाशी येथे शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप तर दुपारी बारा वाजता पाडळी येथील गोपाळ समाजाच्या मुला मुलींना कपडे वाटप होणार आहे. शनिवारी (एक एप्रिल) रोजी सकाळी दहा वाजता जठारवाडी येथील प्रशालेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर दुपारी एक वाजता गरीब विधवा महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहे. रविवारी (२एप्रिल) सकाळी अकरा वाजता गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथे शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तर दुपारी एक वाजता कातळी येथील मदरशातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साहित्य वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.