शिरोली दुमालात जनाबाई नारायण पाटील अत्याधुनिक नेत्र रुग्णालय ! ग्रामीण भागासाठी रुग्णालय उपयुक्त ठरेल !!
schedule27 Apr 23 person by visibility 1762 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे डॉ.अतिग्रे हॉस्पिटल आणि डॉ.गडकर आय हॉस्पिटल, संचालित कै.जनाबाई नारायण पाटील डोळ्याचा दवाखान्याचे व श्री.गणेश क्लिनिकच्या नूतन वास्तूचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी याप्रसंगी डॉ.अतिग्रे कुटुंबियांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले.
याप्रसंगी डॉ.संदीप श्रावस्ती, डॉ.आर.जी.अतिग्रे, डॉ अमित गडकर, डॉ.श्याम माने यांची प्रमुख उपस्थिती होती. गोकुळचे चेअरमन पाटील म्हणााले, “हॉस्पिटल मध्ये नव्याने सुरु झालेला ग्रामीण भागातील हा पहिलाच डोळ्याचा दवाखाना आहे. शिरोली दुमाला परिसरातील तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना याचा फायदा होईल. तसेच या ठिकाणी सुरु होत असलेल्या प्राथमिक नेत्र तपासणी,उपचार, सेवा सुविधांसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या रुग्णालयामार्फत केले जाईल. कै.जनाबाई नारायण पाटील नेत्र रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा नागरिकांनसाठी उपयुक्त ठरतील. ”
डॉ.अमित गडकर म्हणाले कि या रुग्णालयातील अल्पदरात डोळ्याची तपासणी ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया , कॉम्पुटरराईज्ड डोळे तपसणी, मधुमेहावरील नेत्रपटल निदान व उपचार, विनाटाका, विनाभूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया,नेत्रपटल लेसर शस्त्रक्रिया, नवजात बालकाचे नेत्रपटल व निदान व उपचार अश्या अनेक सुविधा डॉ.अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.आर.कांबळे यांनी केले. अक्षय व्हरपे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ.राजश्री अतिग्रे, डॉ स्नेहल गडकर,डॉ.विजय अतिग्रे, डॉ मोरे, सचिन पाटील भैया, , वरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापूरे,माधव पाटील ,बाजीराव पाटील, सुभाष पाटील, एस.के.पाटील ,माजी पंचायत समिती सदस्य सुनील पाटील, एस.के.पाटील,चेतन पाटील, अभिजित पाटील,गणपती अतिग्रे, उपस्थित होते.