Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चौथी - सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा 26 एप्रिलला भाजपतर्फे जिल्हा परिषद- पंचायत समितीसाठी सोमवारपासून मुलाखती प्रभाग बारामधून जितू सलगरची माघार, महायुतीला पाठिंबा राजकारणात कदमांच्या तिसऱ्या पिढीचे पाऊल, स्वरुप ठरतोय आश्वासक चेहराव्हिजन मॉडर्न प्रभागाचे…स्मार्ट कोल्हापूरचे ! हटके काम, स्मार्ट प्रभाग ! नकातेंचा विकासकामांचा धडाका ! !मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानला कोल्हापुरात प्रतिसाद, लोकवर्गणीतून जमली कोट्यवधीची रक्कममहायुतीच्या प्रचाराला मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री येणार, महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल संयमी नेतृत्वाचे, विकासात्मक व्हिजन विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचे

जाहिरात

 

सांस्कृतिक दहशतवादाला सडेतोड उत्तर देणारा शाहूग्रंथ - प्रा. प्रकाश नाईक

schedule22 Jun 24 person by visibility 500 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर - "राजर्षी शाहूंची वाङ्मयीन स्मारके" हा ग्रंथ सध्याच्या सांस्कृतिक दहशतवादाला उत्तर देण्यास उपयुक्त ठरणारा आहे. राजर्षी शाहू महाराज प्रागतिक विचारांचे होते, त्यांच्या विचारांची पॉवर धगधगती ठेवण्याचे काम हा ग्रंथ करीत आहे,” असे मत श्री शिव-शाहू महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. प्रकाश नाईक यांनी केले. 
कोतोली येथील श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, संशोधन समिती व राजर्षी शाहू अध्यासन, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त  डॉ. जे. के. पवार लिखित "राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके" या ग्रंथावर  चर्चासत्र आयोजित केले होते. याप्रसंगी प्ना. नाईक बोलत होते. माजी प्राचार्य डॉ. जे. के. पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्था सचिव शिवाजीराव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, संचालक डॉ.अजय चौगुले उपस्थित होते.
राजर्षी शाहूंची वाड्.मयीन स्मारके या ग्रंथावर  प्रा. डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. पी. डी. माने यांनी मनोगते व्यक्त केली.   कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उमा पाटील यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. डॉ. यू. एन. लाड यांनी आभार मानले.  डॉ. एम. के. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes