+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Sep 22 person by visibility 251 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
यंदा उसाची एफआरपी एकरकमी तर घेऊच उसाला दर किती घ्यायचे ते आम्ही १५ ऑक्टोबरच्या ऊस परिषदेत ठरवू. एफआरपी द्यायचीच होती तर महाविकास आघाडी सरकारने एफआरपीची मोडतोड करण्याचा बेकायदेशीर कायदा केला, त्यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे गप्प का बसले, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील साखर कारखाने यंदा एकरकमी एफआरपी देतील, असे सुतोवाच केले. बँकेचे संचालक आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उसाच्या गाडीचे टायर न फोडण्याचा अनाहूत सल्ला देखील दिला.यावर राजू शेट्टी पत्रक काढून त्या दोन्ही नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. शेट्टी यांनी पत्ररकात कम्हटले आहे, शेतकरी काय गंमत म्हणून टायरी फोडत नाही. ज्यावेळी साखर कारखानदारांकडून शेतकर्यांची पिळवणूक होते व त्याला रस्त्यावर यायला भाग पाडतात, त्यावेळी त्याच्याकडून घडलेली ही प्रतिक्रिया असते. विधीमंडळामध्ये एफआरपीचे तुकडे करण्याचा बेकायदेशीरपणे कायदा मंजूर केला, त्यावेळी हे दोघे मंत्री तोंड मिटून गप्प का बसले, या प्रश्नाचे उत्तर शेतकरी मागत आहेत. एका बाजूला एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केला तर दुसरीकडे शेतकर्यांच्या संघटीत शक्तीपुढे लोटांगण घालून एफआरपी देण्याची तयारी दाखवायची, तुम्ही असले धंदे बंद करा. गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला एफआरपी सोडून अधिक दोनशे रूपये द्यावे लागतील. इथेनॉल मधून चांगला पैसा मिळालेला आहे. साखरेला दर चांगला मिळाला आहे. एफआरपी पेक्षा जास्त किती देताय ते सांगा मग आम्ही ऊस परिषदेत ठरवू, उसाला किती दर घ्यायचे.