महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महायुतीच्या विजयाच्या घोषणा, हाती भगवा झेंडा आणि डोक्यावर भगवा टोप्या परिधान करून सहभागी झालेले हजारो कार्यकर्ते, हलगीचा कडकडाट आणि वाद्यांचा गजर अशा जल्लोषी वातावरणात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
संपर्क निरीक्षक उदय सावंत, खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे शिवाजी जाधव, महादेव यादव आरपीआयचे उत्तम कांबळे दत्ता मिसाळ, सोमनाथ घोडेराव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हाराफुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये महायुतीचे नेतेमंडळी उभे राहून नागरिकांना अभिवादन करत होते. महायुतीचा विजय असो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विजय असो, अशा घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली. उन्हाची तमा न करता रॅलीमध्ये हजारो कार्यकर्ते व मतदार मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर कॉर्नर, बसंत बहार रोड, ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली निघाली.
तत्पूर्वी दसरा चौक येथे झालेल्या सभेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने यांची भाषणे झाली. राजेश क्षीरसागर म्हणाले, गेल्या पाच वर्षात शहर विकासासाठी प्रचंड कामे केली. मोठ्या प्रमाणात निधी आणला कोल्हापूर उत्तरमधून मला उमेदवारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. महायुतीच्या माध्यमातून शहर विकासासाठी योगदान देता आले याचे मोठे समाधान आहे महापालिकेतल्या पाचशेहून अधिक रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय झाला याचा खूप मोठा आनंद आहे. दरम्यान खोटं बोल पण रेटून बोल हे काँग्रेसची निती आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी माझ्या विरोधात लोकांची दिशाभूल केली. मात्र मी सातत्याने लोकांच्या संपर्कात आहे. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. महायुतीतले सर्व घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. लोकांचे साथ असल्यामुळे मला या निवडणुकीत विजयाची खात्री आहे. खासदार धैर्यशील माने म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अडीच वर्षात आमदार नसताना शहर विकासासाठी मोठे केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा हा शिलेदार आहे. शहरवासीयांचा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित आहे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, महायुतीला कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. राजेश क्षीरसागर यांच्या बाजूने सर्वसामान्य जनता आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या कालावधीत प्रत्येकाने सतर्क राहून घरोघरी राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी पोहोचवा. काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मतदारसंघांमध्ये उमेदवार लादला आहे. काँग्रेसचा उमेदवार त्यांच्याच नगरसेवकांना मान्य नाही. कोल्हापूर उत्तर मधून महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर हे निश्चित विजयी होतील.
अर्ज भरण्याच्या निमित्ताने महायुतीने कोल्हापुरात जंगी शक्ती प्रदर्शन केले. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षासह महायुतीतील समाविष्ट सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत एकजूट दाखवली. रॅलीच्या अग्रभागी महिला होत्या. त्या पाठोपाठ तीनही पक्षाचे कार्यकर्ते झेंडे हाती घेऊन रॅलीत सहभागी झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोंचे फलक लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अशा घोषणांनी मार्ग दणाणून सोडला. महायुतीचा विजय असो, राजेश क्षीरसागर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत रॅली निघाली. राजेश क्षीरसागर यांचा फोटो व " हक्काचा माणूस - कामाचा माणूस" असा मजकूर लिहिलेले टी-शर्ट कार्यकर्त्यांनी परिधान केल्या होत्या. धनुष्यबाण चिन्हाच्या प्रतिकृतीही रॅलीमध्ये आणल्या होत्या." रॅलीमध्ये माजी महापौर सुनील कदम, दीपक जाधव, नंदकुमार वळंजू, माजी नगरसेवक सुहास लटोरे, नंदकुमार मोरे, बाबा पार्टे, महेश सावंत, उत्तम कोराने, राहुल चव्हाण, प्रदीप उलपे, प्रकाश गवंडी, सतीश लोळगे, नंदकुमार गुजर, रूपाराणी निकम, उमा इंगळे, संतोष लाड, प्रताप देसाई, नाना आयरेकर , विकी महाडिक, इंद्रजीत जाधव, वैभव माने, शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव, अजित सासणे, हेमंत पाटील, अमर क्षीरसागर, किशोर घाटगे, सुनील जाधव, उदय भोसले, अशोक देसाई, कुलदीप गायकवाड, राजेश पाटील चंदुरकर, सुनील गाताडे, राजू वाली, सतीश खोतलांडे, राहुल नष्टे , पद्माकर कापसे, शिवसेना महिला आघाडीच्या मंगल साळुंखे, पूजा भोर, पूजा पाटील, पवित्रा रांगणेकर, अमरजा पाटील, भाजपच्या गायत्री राऊत, श्वेता गायकवाड, धनश्री तोडकर, राष्ट्रवादीच्या जहिदा मुजावर , कुणाल शिंदे, विशाल शिरवळकर, संजय जासूद , विपुल भंडारे यांच्यासह हजारो कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग होता