महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी राहुल रोकडे ! रविकांत अडसूळांची नियुक्ती सांगलीत !!
schedule27 Mar 24 person by visibility 691 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी राहुल रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २६ मार्च रोजी यासंबंधीचा आदेश काढला आहे. राज्यातील वेगवेगळया महापालिकेत मिळून नऊ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर कोल्हापूर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांची सांगली, मिरज कुपवाड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूर महनगरपालिकेचे नूतन अतिरिक्त आयुक्त रोकडे हे गटविकास अधिकारी संवर्गातील आहेत.
दरम्यान कोल्हापूर महापालिकेतील तत्कालित अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या. तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. पण कोल्हापुरात एकाच अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात अन्य ठिकाणच्या नियुक्तीमध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गातील लक्ष्मीकांत साताळकर यांची अहमदनगर महापालिका उपायुक्तपदी, सहायक आयुक्त राज्यकर विभागातील श्रीकांत पवार यांची अहमदनगर महापालिका उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील श्रीमती संघरत्ना खिल्लारे यांची नवी मुंबई महापालिका उपायुक्तपदी तर सहायक निबंधक स्मृती पाटील यांनी इचलकरंजी महानगरपालिका उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. उल्हासनगर महापालिका उपायुक्तपदी किशोर गवस, पनवेल महानगरपालिका उपायुक्तपदी बाळासाहेब राजळे, लातूर महापालिका उपायुक्तपदी पंजाब खानसाळे यांच्या प्रतिनियुक्त्या करण्यात आल्या आहेत.