खाजगी प्राथमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर
schedule26 Nov 24 person by visibility 117 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वीस कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांना प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी मंजुरी दिली. हे कर्मचारी खासगी प्राथमिक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर झाले आहेत.
खाजगी प्राथमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लिपिक व सेवक हे एकाकी पद असल्यामुळे या पदाला २४ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर दिला जाणारा निवड श्रेणीचा लाभ दिला जात नव्हता. पण राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळावा यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागला. दरम्यान राज्य सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली.त्यामुळे गेल्या अनेक वर्ष शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळाला नव्हता. पण १ जानेवारी २०२४ रोजी सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवड श्रेणीचा लाभ देण्याबाबत आदेश लागू केला.
या प्रस्ताव मंजुरीच्या आदेश वितरणावेळी प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे, एम डी पाटील राजेंद्र कोरे प्रदीप मगदूम, सागर जाधव जितेंद्र पाटील विद्या बारामते अनघा अग्निहोत्री सुस्मिता जोशी अर्जुन कांबळे फिरोज नायकवडी रुपाली कुलकर्णी उपस्थित होते.