वीज कंत्राटी कांमगारांच्या प्रलंबित मागण्या सुटाव्यात, संघटनेची नव्या सरकारकडे मागणी
schedule26 Nov 24 person by visibility 32 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वीज कंत्राटी कांमगारांच्या प्रलंबित मागण्या सुटाव्यात अशी अपेक्षा महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे.
संघटनेने पत्रकात म्ह्टले आहे, ‘महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत तत्कालिन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी बैठक घेन संघटनेला खूप सहकार्य केले. त्यांनी अनेक समस्यांवर तोडगे काढले १९ टक्के पगार वाढ दिली. वीज कंपनीतील अधिकाऱ्यांनी कामगार हितार्थ काही चांगली परिपत्रके काढली. मात्र १९ टक्के पगारवाढी बाबत जी परीपत्रके काढली ती जाणीवपूर्वक चुकीची काढली का ? याची चौकशी करून यात पुन्हा दुरुस्ती करून नवीन परिपत्रके काढण्याची सूचना नवीन ऊर्जामंत्री यांनी प्रशासनाला करावी अशी कामगार हितार्थ पहिली मागणी करणार असल्याचे अध्यक्ष निलेश खरात यांनी कळवल.
नवीन महायुती सरकार संपूर्ण बहुमताने आले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन नवीन ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात संघटनेला स्कारात्म सहकार्य करतील व कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास महामंत्री सचिन मेंगाळे संघटनेने व्यक्त केला. खरात, मेेंगाळे याच्यासह प्रदेश कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.