Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
परख –राष्ट्रीय सर्व्हेक्षणमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथमशक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात जलसमाधी आंदोलन, पोलिसांनी रोखले कार्यकर्त्यांनाशक्तिपीठ महामार्ग विरोधात जोरदार आंदोलन, तीन तास राष्ट्रीय महामार्ग ठप्पस्त्यावर जनावरे, मालकांना दंड ! महापालिकेकडून राजारामपुरीत कारवाईफुटबॉलपटूची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, निखिल खाडेचे निधनतात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजच्या विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायमआझाद मैदान येथील शिक्षक आंदोलनाला राजकीय नेत्यांचा पाठिंबासतेज मॅथ्समुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड वाढेल – देवश्री पाटीलजिपचा  शिक्षण विभाग राज्यात अव्वल, शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर प्रथमस्थानी !हर्षल सुर्वे शिवसेना शिंदे गटात ! राजेश क्षीरसागरांच्या उपस्थितीत प्रवेश !!

जाहिरात

 

बाजार समिती सभापतिपदी जनसुराज्यचे प्रकाश देसाई, उपसभापतिपदी सोनाली पाटील

schedule24 Jun 24 person by visibility 538 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रकाश  पांडुरंग देसाई यांची निवड झाली. उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोनाली शरद पाटील यांची निवड झाली. नूतन पदाधिकारी निवडीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाची सोमवारी, (२४ जून २०२४) विशेष सभा झाली. प्राधिकृत अधिकारी डॉ. प्रिया दळणार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या निवडीनंतर समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी केली. गुलाल उधळला
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्यसह विविध पक्षांची  संयुक्त आघाडी सत्तेत आहे. यापूर्वी काँग्रेसकडे बाजार समितीचे सभापतिपद होते. आघाडीच्या सत्ता फॉर्म्युलानुसार या निवडी झाल्या. काँग्रेसचे भारत पाटील-भुयेकर यांनी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. नूतन पदाधिकारी निवडीसाठी बाजार समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये संचालकांची विशेष सभा झाली.
 सभापतिपदासाठी देसाई यांचे नाव संचालक सूर्यकांत पाटील यांनी सुचविले.  संचालक शेखर देसाई यांनी अनुमोदन दिले. उपसभापतिपदासाठी पाटील यांच्या नावाला संचालक पांडुरंग काशीद सूचक आहेत. संचालक नानासो कांबळे यांनी अनुमोदन दिले. सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. यावेळी संचालक बाळासाहेब पाटील, मेघा देसाई, राजाराम चव्हाण, शिवाजीराव पाटील, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, संभाजी पाटील कुडित्रेकर, नंदकुमार वळंजू, शंकर पाटील, सचिव जयवंत पाटील उपस्थित होते. उपसभापती सोनाली पाटील या माजी आमदार के पी पाटील यांच्या गटाचे आहेत. सभापती पदासाठी पांडुरंग काशीद इच्छुक होते. तर राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील यांनी यावर्षी आपणाला पद नको असे नेते मंडळींना सांगितले होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes