महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील न्यू पॉलिटेक्निकच्या ऑटोमोबाईल, सिव्हिल व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग या तपासणीसाठी अर्ज केलेल्या तिन्ही कोर्सेसना राष्ट्रीय मान्यता मंडळ (एनबीए) नवी दिल्लीच्या समितीकडून ८ ते १० मार्च रोजी झालेल्या तपासणीत तीन वर्षांची मान्यता प्राप्त झाली. तपासणी प्रक्रियेत मंडळाने निश्चित केलेल्या नऊ कठोर निकषांमधील सर्वच बाबींचे सखोल व काटेकोर मूल्यांकन केले गेले.
"औद्योगिक व व्यावसायिक संस्था आणि माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यातून आमचे प्राध्यापक परिणामाधारित शिक्षण, विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन या पातळीवर प्रशंसनीय कामगिरी करत आहेत. विद्यार्थी उद्योगस्नेही होण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा, पूरक कोर्सेस व व्यावसायिक व्यासपीठ यांची तपासणी समितीने विशेष दखल घेतली असे कॉलेज व्यवस्थापनने सांगितले. एनबीए समन्वयक प्रा. अभिजीत वालवडकर यांच्यासोबत सर्व विभागप्रमुख, शैक्षणिक समन्वयक, रजिस्ट्रार, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांनी एकसंघ होवून दिलेल्या योगदानातून न्यू पॉलिटेक्निकने ही उच्चतम क्षमता गाठली आहे. या प्रक्रियेत संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे, चेअरमन डाॅ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण आणि संचालक मंडळ यांचे पाठबळ लाभले. पुढील टप्प्यात उर्वरित कोर्सेसच्या मान्यतेची प्रक्रिया राबवली जाईल", असे प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे यांनी नमूद केले.
न्यू पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांना जगातील नामांकित विद्यापीठांत उच्च शिक्षणासाठी आणि अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठीचा मार्ग सुकर झाला आहे", अशी माहिती संस्थेचे चेअरमन डाॅ. के. जी. पाटील यांनी दिली.
"गेली ४० वर्षे तंत्रशिक्षण क्षेत्रात दीपस्तंभ ठरलेल्या न्यू पॉलिटेक्निकच्या उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कटिबद्धतेची ही पोचपावती आहे", अशा शब्दांत संस्थेचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी न्यू पॉलिटेक्निकमधील सर्व घटकांचे कौतुक केले.
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वास्तूविद्या, औषधनिर्माण, हाॅटेल व केटरिंग व्यवस्थापन अशा तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी एनबीएचा भर आहे. नॅककडून संस्थेचे मुल्यांकन केले जाते, तर एनबीएकडून संस्थेतील विविध अभ्यासक्रमांना कठोर निकषांवर आधारित मान्यता दिली जाते.असे दाभोळे यांनी स्पष्ट केले.य
पत्रकार परिषदेला नितीन पाटील, बाजीराव राजीगरे, संग्रामसिंह पाटील, विक्रम गवळी, सुहासचंद्र देशमुख, दिपक जगताप व संदिप पंडे उपस्थित होते.