+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Sep 22 person by visibility 520 categoryउद्योग
 लाभांशमध्ये कपात, कर्जाचा व्याजदर 10.90 टक्के
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शतक महोत्सवी राजश्री शाहू गव्हर्नमेंट सव्हऺंटस को-ऑपरेटिव्ह बँकेला आर्थिक वर्षात एक कोटी 81 लाख ६१ हजार इतका नफा झाला आहे. बँकेमार्फत सभासदांना साडेसात टक्के लाभांश देण्याची घोषणा चेअरमन शशिकांत तिवले यांनी केली. बँकेची 105 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 18 सप्टेंबर रोजी पार पडली. सभा शांततेत झाली मात्र या सभेत सभासदांच्या प्रश्नाचे वाचन झाले नाही‌. कोणत्याही स्वरूपाचे चर्चा नाही. मंजूर मंजूर अशा घोषणा देत विषय पत्रिकेवरील बारा विषय मंजूर करण्यात आले. सकाळी अकरा वाजता सभा सुरू झाली आणि सव्वा अकरा वाजता सभा संपली. पंधरा मिनिटात सभा झाली.सभा  संपल्यानंतर सभासदांनी अध्यक्ष व संचालक मंडळाचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावर गर्दी केली.
 सभेत अध्यक्ष तिवले यांनी बँकेच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली राजश्री शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता महोत्सवानिमित्त बँकेने जाहीर केलेल्या ठेव योजनेला सभासदांनी, नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले. बँकेने सलग बारा वर्ष निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे असे त्यांनी निदर्शनास आणले. शिवाय बँकेने कर्जाची मर्यादा अठरा लाख केले आहे.  आकस्मिक कर्ज मर्यादा दीड लाखापर्यंत केले. तर कर्जाचा व्याजदर 10.90 टक्के इतका केला आहे अशी माहिती त्यांनी सभेत दिली. पुढील वर्षी ज्यादा लाभांश दिला जाईल असेही अध्यक्ष तिवले यांनी सांगितले. त्यांच्या या घोषणेचे सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
३१ मार्च २०२२ अखेर एकूण ठेवी १७९ कोटी ४४ लाख २२ हजार इतक्या झालेल्या आहेत ठेवीवर दरमहा, तिमाही व ठेवीदारांच्या मागणीनुसार व्याज देण्याचे सुविधा बँकेने चालू ठेवलेली आहे. ठेवींना विमा संरक्षण आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारात मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे सांगितले.
सभेला सभासदांनी चांगली गर्दी केली होती. सभा सुरू होण्यापूर्वी प्रतिभानगर येथील प्रतिभानगर सोसायटीचे सभागृह सभासदांनी भरले. अध्यक्ष व संचालक मंडळ सभासदांच्या स्वागताला प्रवेशद्वारावर उभे होते. सकाळी अकरा वाजता सभा सुरू झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केले. अध्यक्ष तिवले यांनी वर्षभराचा आढावा मांडला. अध्यक्ष तिवले यांनी मनोगतामध्ये सत्तारुढ संचालक मंडळाला पुन्हा निवडून दिल्याबद्दल सभासदांच्या आभार व्यक्त केले. सभेपुढील विषयांचे वाचन करण्यात आले. काही मिनिटांतच सगळे विषय मंजूर झाले.
विषय पत्रिकेवरील वाचन सुरू असताना काही सभासदांनी लाभांश का कमी केला असे विचारणा केली तसेच व्याजदराचा टक्का का वाढविला असा प्रश्न केला. मात्र व्यासपीठासमोर बसलेल्या सभासदांनी मंजूर मंजूर असा घोष केला. विषय पत्रिकेवरील सगळे विषय मंजूर केल्याने पंधरा मिनिटात सभा संपली.
 सभेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे वाचन झाले नाही. प्रश्नोत्तरे झाले नाहीत. आयत्या वेळच्या विषयावर चर्चा नाही. गेल्या वर्षी नऊ टक्के लाभांश होता यंदा त्यामध्ये  कपात केली याबद्दल काही सभासदांनी नाराजी व्यक्त केली तसेच कर्जाचा व्याजदर दहा टक्क्यावरून १०.९० केल्यामुळे सभासदांनी नाराजी व्यक्त केली. सभेसाठी बैठक व्यवस्था अपुरी पडल्याचे दिसले. सभागृहात सभासद मोठ्या संख्येने उभे होते तर काही सभासद सभागृहाबाहेर थांबले. सभेला बँकेचे उपाध्यक्ष रमेश घाटगे, संचालक रवींद्र पंदारे, मधुकर पाटील अतुल जाधव रोहित बांदिवडेकर, सदानंद घाटगे, अजित पाटील, हेमा सुभाष पाटील, श्रीमती मनुजा रेणके, संजय खोत, प्रकाश पाटील, किशोर पवार, अरविंद आयरे, दिलीप मिरजे, विनायक कांबळे, रामदास कोकीतकर उपस्थित होते