Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डीवाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटला सुवर्णपदककेआयटीत राष्ट्रीय स्तरावरील आयडियाथॉन,  ७१ इनोव्हेशनचे तरुणाईकडून सादरीकरण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्र्यांना गल्लीबोळात फिरायची वेळ आणली–राहुल देसाईउच्चांकी गर्दी, अठरा कोटींची उलाढाल ! भीमा कृषी प्रदर्शनाचा रेकॉर्ड!!आता विश्रांती नाही, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवणार - सतेज पाटील थकीत भत्त्यासाठी शिक्षकांचा शुक्रवारी महापालिकेसमोर शंखध्वनी आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया कोरेंच्या  उपस्थितीत चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, जनसुराज्य व भाजप म्हणजे दोन शरीर- एक आत्मातात्यासाहेब कोरे डिप्लोमाच्या २१ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवडजिल्हा परिषदेत मोठा भाऊ कोण ? भाजप - राष्ट्रवादीत भाऊबंदकी, अध्यक्षपदावरुन घासाघीस ! !

जाहिरात

 

केआयटीत राष्ट्रीय स्तरावरील आयडियाथॉन,  ७१ इनोव्हेशनचे तरुणाईकडून सादरीकरण 

schedule17 Feb 26 person by visibility 22 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयडियाथॉन-२५ या इनोव्हेशन व उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी त्यांच्यामध्ये प्रश्न सोडवण्याची  वृत्ती मूळ धरावी, इनोव्हेशन्स आणि स्टार्टअपला पोषक  वातावरण त्यांना मिळावे या हेतूने अशा स्पर्धेची योजना करण्यात आली. नाविन्यपूर्ण कल्पना शोधणे,त्यातून निवडलेल्या नवीन नवीन कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याच्या हेतूने एक सक्षम लॉन्च पॅड त्यांना उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

देशभरातील १०० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्रातील संशोधक,उद्योजक यांनी सहभाग नोंदवला. केआयटीच्या वतीने नवोउद्योजकांना शेती तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आयओटी बेस्ड तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आधी विविध विषयातील उत्तम संशोधन,स्टार्ट अप आयडीया या स्पर्धेसाठी अपेक्षित होत्या. या आयडियाथॉन २०२५  साठी एकूण ३५० पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण कल्पना प्राप्त झाल्या. त्यातील २३१ कल्पनांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले व या दुसऱ्या फेरीतून अंतिम फेरीसाठी फक्त ७१ कल्पना या निवडण्यात आल्या.

 केआयटी आयआरएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी यांनी  केआयटीच्या आजपर्यंतच्या कामांची माहिती दिली. डॉ. मोहन वनरोट्टी यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, नवकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सकस व सुदृढ वातावरण निर्माण करून देण्यामध्ये केआयटी आयआरएफ सकारात्मक व यशस्वी प्रयत्न करत असल्याबाबत त्यांनी सांगितले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संजय रानडे रचना डॉ. शाम आडेपल्ली यांची विशेष उपस्थिती होती. इंक्युबेशन मॅनेजर समीर पुनस्कर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली , उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले, यांनी आयडियाथॉन-२५ च्या यशस्वी नियोज बद्दल केआयटी आयआरएफचे अभिनंदन केले. इंक्युबेशन असोसिएट ऋषिकेश दुधगावकर यांनी सूत्रसंचालन केले. पार्थ हजारे व संदीप लाड यांनी या स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळली. इंक्युबेशन मॅनेजर देवेंद्र पाठक यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes