माई ह्युंदाई ग्रुपचा आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव !! चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स पुरस्कार प्रदान !!
schedule05 Feb 25 person by visibility 128 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बाकू (अझरबैजान) येथे ह्युंदाई मोटर्स लिमिटेडच्यावतीने झालेल्या "नॅशनल डीलर्स कॉन्फरन्स"मध्ये माई ह्युंदाई ग्रुपला "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स" पुरस्कार प्राप्त झाला. भारतातील एकूण ६०० डीलरशिप्समधून माई ह्युंदाईला हा पुरस्कार प्राप्त झाला. माई ह्युंदाईचे कार्यकारी संचालक तेज घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
माई ह्युंदाई, ह्युंदाई मोटर्सच्या पश्चिम व कोकण विभागातील आघाडीची डीलरशिप म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० हजारांहून अधिक ग्राहकांना माई ह्युंदाईने उत्तम सेवा दिली आहे. ग्राहकांच्याप्रती उत्कृष्ट सेवा देणाऱ्या माई हयुंदाईचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्या आले. याप्रसंगी माई ह्युंदाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले, महाव्यवस्थापक विशाल वडेर, सतीश पाटील उपस्थित होते.
.....................................
“ ग्राहक सेवेबद्दल यापूर्वीही अनेकदा माई ह्युंदाईला गौरविले आहे. नवीन वर्षातील हा पुरस्कार माई ह्युंदाई ग्रुपला प्रेरणा देणारा आहे आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. माई ह्युंदाईच्या या गौरवाबद्दल आमचे ग्राहक, कर्मचारी, व्हेंडर्स या सर्वांना मी धन्यवाद देतो.’.
- तेज घाटगे, कार्यकारी संचालक, माई ह्युंदाई ग्रुप