महालक्ष्मी अन्नछत्राच्या शिबिरात ४०० हून अधिक रक्तदात्यांचे रक्तदान
schedule05 Feb 24 person by visibility 313 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट आणि श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ४०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. अर्पण रक्त पिढीच्या डॉक्टरांनी सहकार्य केले.
रक्तदान शिबिरामध्ये भाविकांनीही सहभाग दर्शवला. अशोक मेवेकेरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महालक्ष्मी धर्म शाळेच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महालक्ष्मी हेल्थ चेक अप कार्डचे वाटप करण्यात आले .या कार्डच्या माध्यमातून रुग्णांना सर्व तपासणीवर २५ टक्के सवलत मिळणार आहे. श्रुतिका इमेजिंग अँड डायग्नोस्टिक सेंटर यांच्या सहकार्याने तपासणी होणार आहे.
डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. प्रकाश गाडवे, माधव ढवळीकर यांनी शिबिराचे नियोजन केले. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचे संयोजन एस. के. कुलकर्णी, संजय जोशी ,राजेश सुगंधी, सुनील जोशी, सुनील खडके, प्रशांत तहसीलदार, तन्मय मेवेकरी , विराज कुलकर्णी, रणजीत सुगंधी, आदित्य मेवेकरी, तन्मय झाड, संग्राम सरनाईक, प्रसाद जोशी यांनी केले.