Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावलेआयटीआयमध्ये रोजगार मेळावा, तीस जणांची निवडहरित शिरोलीसाठी कारखानदार सरसावले, स्मॅक भवन परिसरात १२५ देशी वृक्षांचे रोपणस्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला – डॉ. ए. के. गुप्ता अध्यक्ष, सीईओ, सभापतींची शाळेपर्यत धाव ! विद्यार्थिनींच्या प्रकृतीची घेतली माहिती ! !कोल्हापूरच्या आयटी क्षेत्राला जागतिक भरारीचे पंख! कोल्हापुरातील आयटी कंपन्या करणार अमेरिकेला सॉफ्टवेअरसह इतर सेवा निर्यात ! !सूरज साखरेवरील गोळीबार प्रकरणी दोन आरोपींना अटकपृथ्वी अजित मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिरकृषी पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत डीवाय पाटील कृषीचे विद्यार्थी राज्यात प्रथमदक्षिण भारत जैन सभेचे १०४ वे नैमित्तिक अधिवेशन २ ऑगस्टला कोल्हापुरात

जाहिरात

 

कुलगुरू भेटीला, साहित्यिक भारावले

schedule18 Jul 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी शनिवारी, (१८ जुलै २०२६ ) ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांची सदिच्छा भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. कुलगुरूंच्या या भेटीमुळे ९२ वर्षांचा हा साहित्यिक भारावून गेला. कुलगुरु कामत यांनी नलगे यांची त्यांच्या कोतोली रोडवरील निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. या भेटीदरम्यान डॉ. कामत आणि नलगे यांच्यात मनमोकळा संवाद झाला. कुलगुरुंनी, नलगे यांच्या साहित्यिक योगदानाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञतापूर्ण भावना व्यक्त केल्या. शिवाजी विद्यापीठाच्या 'कमवा आणि शिका' या योजनेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल तसेच अन्य जुन्या आठवणींविषयी बोलताना चंद्रकुमार नलगे यांना गहिवरुन आले. विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून आपण इतक्या आस्थेने विचारपूस करण्यासाठी आलात, असे म्हणत असताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. त्यांनी आपली काही निवडक पुस्तके कुलगुरूंना भेट दिली. यावेळी प्रदीप नलगे, अनिता नलगे आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes