+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Jul 20 person by visibility 2384 categoryसंपादकीय

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेला सन्मानित करावे अशी मागणी खाटिक समाजाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सतेज पाटील यांना ईमेलद्वारे या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.

सिनेमा पोस्टरच्या दुनियेतील सम्राट म्हणून जी. कांबळे यांची ओळख आहे. भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता दिसते त्याचा पाया कलायोगींनी घातला. दिल्लीत १९६० मध्ये ‘मुगले आझम’सिनेमाची जी. कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांनी आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. पोस्टर पेटिंग पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या होत्या. कलायोगी जी कांबळे यांनी पोस्टर पेंटिगला अभिजात कलेसारखा दर्जा मिळवून दिला. त्यांनी महापुरुषांची व्यक्तीचित्रे रेखाटली. सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला सरकारची अधिकृत चित्र म्हणून राज्यमान्यता मिळाली.

कलायोगी जी. कांबळे यांच्या कलेची क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारने त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी समाजाने केली आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव संजय भोपळे, अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी या मागणीचे निवेदन मेल केले आहे.