चाणक्य मार्शल आर्ट्सचे आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धत यश
schedule28 May 23 person by visibility 314 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
नेपाळ देशाची राजधानी काठमांडू येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर कराटे स्पर्धेमध्ये चार खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत घवघवीत यश मिळवले. या स्पर्धेचे आयोजन नेपाळ शितोरियु कराटे डो असोसिएशन यांनी केले होते . या स्पर्धेमध्ये सुमारे काताज व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
चाणक्य संस्थेच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड झाली होती. स्वयंम प्रशांत जगदाळे, दीप्ती विनोद खाडे, प्रांजल प्रशांत मिठारी, आमना अकबर खान या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले.
या विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय पंच सेन्साई संदीप लाड, मुख्य प्रशिक्षिका सेम्पाई ,पूजा चौगले मॅडम, स्वाती माने, मॅडम , कृष्णा माने , प्रियांका करवळ, गौरी इंगळे, यांचे प्रशिक्षण लाभले तर रमेश पिसाळ व अविनाश पाटील याचे प्रोत्साहन लाभले.