Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवारवारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालयबार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूतकोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणीविवेकानंद  कॉलेजमध्ये  राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवानिवृत्तीनिमत्त सत्कारशहर स्वच्छतेच्या कामकाजात कसूर झाल्यास आरोग्य निरीक्षक - मुकादमांवर कारवाई ! आयुक्त करणार पहाटेही तपासणी ! !

जाहिरात

 

बार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूत

schedule01 May 26 person by visibility 12 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलने बाजी मारली. मंडलिक पॅनेलने अध्यक्ष, उपाध्यक्षपदासह आठ जागा जिंकल्या आहेत.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अॅड.संजय घाटगे हे विजयी झाले. त्यांनी, अॅड. प्रशांत चिटणीस यांचा ११७ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अॅड. चिटणीस पॅनेलला सात जागा मिळाल्या. या पॅनेलने सचिव, लोकल ऑडिटरसह सात जागा जिंकल्या.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनसाठी गुरुवारी, ३० एप्रिल २०२६ रोजी मतदान झाले. जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सभागृहात मतदान झाले. जिल्ह्यातील ३८४९ सभासदापैकी २५४२ सभासदांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमधील विजयी उमेदवारांची मते पुढीलप्रमाणे

अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेल – अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र मंडलिक १३२३ मते, उपाध्यक्ष अॅड. संजय घाटगे १२७९, सहसचिव अॅड. अवधूत पाटील १५७६, महिला प्रतिनिधी अॅड. शुभांगी निंबाळकर १३३५, संचालकपदी अॅड. पूनम पाटील, अॅड. योगेश पवार, अॅड. सिद्धार्थ हुक्केरी, अॅड. श्रावणी पारसनीस.

अॅड. प्रशांत चिटणीस – सचिवपदी अॅड. वीरेंद्रसिंह निंबाळकर १३४० मते, अॅड. सर्वेश भादिंगर १५०४, संचालकपदी अॅड. चैत्राली गुरव, अॅड. संदीप वाईंगडे, अॅड. वैभव गोरडे, अॅड. राजवर्धन यादव, अॅड. श्रृतिका पाटील.

…………………………………………

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes