Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई कराडेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीरकेडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट ! हा आयुष्यातील आनंदाचा दिवस -हसन मुश्रीफपी.एस. घाटगे यांचा खासगी शिक्षक महासंघात प्रवेश ! राज्य प्रवक्तापदी निवड !!प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधनक्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिनी रक्तदान शिबिर

जाहिरात

 

जिल्हा कॅरम स्पर्धेत रोहित चौगुलेस विजेतेपद तर गौरव हुदले उपविजेता

schedule20 Sep 22 person by visibility 585 categoryक्रीडा

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी,  कोल्हापूर : 
कोल्हापूर जिल्हा अमॅच्युअर कॅरम असोसिएशनचे वतीने " "आयुर्विमा चषक "स्पर्धा स्वामी विवेकानंद काॅलेज मधील लायब्ररी हाॅल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत खुल्या गटात रोहित चौगुले यांनी गौरव हुदलेचा 25/13, 25/10 अशा सेटमध्ये पराभव करून आयुर्विमा चषक पटकावला. रोहित चौगुलेने
 कारकिर्दीतील दुसरे विजेतेपद मिळविले. पुरुष गटातील अंतिम सामना रोहित चौगुले यांनी ओळीने दोन बोर्ड घेऊन सातगुण घेऊन आघाडी घेतली.तिसरा बोर्ड गौरवने चारगुण घेऊन आघाडी कमी केली.
पुढील गेम मध्ये रोहितने अचुक खेळ आणि संयम राखत उत्कृष्ट कट मारून पहिला गेम 26/13घेऊन 1/0अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये गौरव अनेक चुका करू लागला.याचा फायदा रोहितने अचुक घेतला.तसेच समोरील पिसेस अचुक घेऊन, सुंदर ब‌ॅक हॅन्ड घेत दुसरा गेम ही 26/10 घेऊन जिल्हा अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकावले . त्याला रोख बक्षीस 5000 व आयुर्विमा चषक देऊन गौरवण्यात आले.. गौरव हुदले यास रोख रू 3000 व चषक देण्यात आला. 
 गतवर्षीचा विजेता इक्बाल बागवान याला उपांत्य फेरीत गौरवने तर रोहित चौगुले यांनी सुनील कांबळे याला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. 
   तृतीय क्रमांकासाठी इक्बालने सुनील कांबळे हरवून तिसऱ्या क्रमांकाचे रूपये 2000 व चषक देण्यात आले. चतुर्थ क्रमांक सुनील कांबळे यांनी मिळून रूपये 1000, चषक देण्यात आला.  स्पर्धेचा बक्षीस समारंभ स्वामी विवेकानंद काॅलेजचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी, कौस्तुभ गावडे, सावली केअर सेंटर चे किशोर देशपांडे, स्पर्धेचे प्रायोजक एल आय सी आॅफ इंडियाचे प्रतिनिधी उप प्रशासन अधिकारी उमेश दिवेकर यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 
 प्रमुख पाहुणे कौस्तुभ गावडे बक्षीस वितरण कार्यक्रमात म्हणाले, कॅरम खेळाडूंनी आपल्या जीवनामध्ये वेळ, शिस्त व योग्य नियोजन केल्यास आपणांस कधीच अपयश येणार नाही.निर्व्यसनी राहून कॅरम खेळाचा मनमुराद आनंद लुटा व कॅरमचा नांव लौकिक वाढवा.
 तसेच कौस्तुभ गावडे यांनी ज्युनिअर सब ज्युनिअर युवक कॅरम स्पर्धा घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
 स्पर्धा यशस्वी करणेसाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष मुरलीधर गावडे, हितेंद्र सांळुखे, सहसचिव जयवंत नलावडे, आशिष हांडे,भरत पाटील.कुण्णी भावी, आकाश शिंदे, राजू यादव, सुरेश चरापले, राम बोंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रमुख पंच म्हणून नामदेव टमके आशिष हांडे शोभा कामत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा किरण पाटील तर आभार प्रदर्शन गौरव हुदले यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes