Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक श्रीशैल देवस्थानात सोळा ते वीस मार्च दरम्यान उगादी महोत्सव जिल्ह्यात सोळा मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम, नो हेल्मेट - नो एट्री जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखातजुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जाहिरात

 

पालकमंत्र्यांनी बुलेट चालवत नोंदविला मिलेट महोत्सव रॅलीत सहभाग

schedule22 Mar 25 person by visibility 524 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाबत जनजागृती करण्यासाठी कृषि विभाग कोल्हापूर यांच्यावतीन शनिवारी भुदरगड तालुक्यातील कूर येथे मिलेट महोत्सवाचे आयोजन केले होते. या महत्त्वाच्या उद्घाटनप्रसंगी रॅली काढण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत मिलेट रॅलीमध्ये सहभाग घेतला.   पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ झाला. या मिलेट रॅलीचे कूर -कोनवडे- नीळपण- दरवाड- म्हसवे- गारगोटी - कूर या मार्गावर आयोजन केले होते. विशेष म्हणजे पालकमंत्री आबिटकर यांनी स्वतः बुलेट चालवत या रॅलीमध्ये इतरांना प्रोत्साहित केले . यावेळी पालकमंत्र्यांनी पौष्टिक तृणधान्य स्टॉलना भेट देत कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून लाभ दिलेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर,पॉवर टिलर,रोटावेटर चे वाटप केले .

या महोत्सवात उपस्थित शेतकरी बांधवांना डॉ योगेश बन (नाचणी पैदासकार) यांनी बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही आता काळाची गरज बनली असल्याचे सांगितले . शेतकरी मिलिंद पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य लागवडीबद्दल  अनुभव कथन केले. ऊस लागवडीबाबत सुरेश माने-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
     यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत मयत शेतकऱ्यांच्या 19 वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे मंजुरी पत्र दिली. फळबाग लागवड उत्कृष्टपणे राबवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले . या पौष्टिक तृणधान्ये महोत्सवामध्ये पाककला स्पर्धा झाली. यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे , रक्षा शिंदे , गोकुळ दूध संघाचे संचालक नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे मदन देसाई.अजित देसाई, माजी उपसभापती मदन पाटील, कूरचे सरपंच कल्याणराव निकम, अशोकराव फराकटे,अशोकराव भांदिगरे, बाबा नांदेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन अधिकारी किरण पाटील नितीन भांडवले सुनील कांबळे  यांनी नियोजन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes