+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाहू महाराज आदर्श व्यक्तिमत्व, त्यांनी निवडणुकीस उभं राहू नये- हसन मुश्रीफ adjustमिलिंद यादव यांना समाजभूषण पुरस्कार adjustशिवाजी तरुण मंडळ केएम फुटबॉल स्पर्धेच्या फायनलमध्ये adjustविवेकानंद कॉलेजला उत्कृष्ठ महाविद्यालय पुरस्कार प्राप्त adjustरस्त्यांचे भाग्य उजळले- एकाच रस्त्यासाठी दोन विभागाचा निधी !! adjustचार्टर्ड अकौंटंटसच्या अध्यक्षपदी तस्लीमअरीफ मुल्लाणी, उपाध्यक्षपदी नितीन हरगुडे adjustजनावरांच्या आरोग्यासाठी गोकुळ सरसावले, गोचिड निर्मूलन-थायलेरिया लसीकरण मोहिम adjustशिवाजी विद्यापीठात पिकणार मोत्यांची शेती adjust खंडोबा तालीम उपांत्य फेरीत, प्रॅक्टिस क्लब पराभूत adjustओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात विद्याधिपती रुपातील पूजा
Screenshot_20240226_151922~2
Screenshot_20240226_195247~2
Screenshot_20240217_224724~2
Screenshot_20240214_132927~2
schedule04 Dec 23 person by visibility 180 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला (गोकुळ) नुकतीच सदिच्छा भेट दिली. गोकुळ परिवारातर्फे संचालक अजित नरके यांच्या हस्ते पंडित यांचा सत्कार करण्यात आला. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला. 
याप्रसंगी बोलताना जिल्हा पोलिस  अधिक्षक महेंद्र पंडित म्हणाले, ‘ सध्या सहकारात काम करणाऱ्या संस्थांना कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे, पण गोकुळने या सर्व कठीण परिस्थितीवर मात करत सहकार क्षेत्रात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गोकुळ ही दूध उत्पादक शेतकरी व या प्रक्रियेतील सहभागी घटक अशाच जवळपास पाच लाखापेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार पुरवणारी ही एक अग्रेसर संस्था आहे.”
याप्रसंगी संचालकनरके यांनी गोकुळच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश  गोडबोले, गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिगंबर गायकवाड, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, प्रकाश आडनाईक, हणमंत पाटील, बाजीराव राणे आदी उपस्थित होते