Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकर

जाहिरात

 

माजी नगरसेवक रमेश पुरेकर शिवसेनेत

schedule17 Jun 25 person by visibility 826 category

त महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीचे  उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार करणारे व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारात सक्रिय असणारे माजी नगरसेवक रमेश पुरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवारी 17 जून रोजी मुंबईत त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यावेळी उपस्थित होते. पुरेकर हे एकदा महापालिकेवर निवडून आले होते. तर  त्यांच्या पत्नी या दोनदा नगरसेविका होत्या. पुरेकर यांचाज्ञ जनसुराज्यमधून  महापालिकेत नगरसेवक म्हणून प्रवेश झाला होता. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या सोबत होते. तर विधानसभा निवडणुकीत त्यांनी राजेश लाटकर यांचा प्रचार केला होता. पुरेकर हे माझे खासदार संजय मंडलिक यांचे समर्थक मानले जातात. महापालिका राजकारणात पुरेकर हे माजी खासदार मंडलिक व आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes