थकबाकीपोटी कोटीतार्थ मार्केटमधील पाच दुकान गाळे सील
schedule21 Mar 25 person by visibility 129 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या सर्व मार्केटमधील गाळेधारकांना २०२५ पासून प्रलंबित भाडे भरण्यासंबंधी नोटिसा काढल्या आहेत. इस्टेट विभागाकडुून वारंवार सूचना व लेखी कळवूनही बहुतांश गाळेधारकांनी थकीत भाडे भरले नाही. शुक्रवारी वॉर्ड कोटीतीर्थ मार्केट धील रविंद्र दिघे, तुकाराम गणपती साबुगडे, दिलीप दामोदर बगाडे, एस.एस.इंडस्ट्रीज, बाबुराव गणपत गुडाळकर या पाच जणांचे दुकानगाळे सील केले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अरुण भोसले, मनिष अतिग्रे, गिरीष नलवडे, जर्नादन भालकर प्रथमेश पोवार, सदानंद फाळके, कल्पना शिरडवाडे यांनी केली. जे गाळेधारक आपले भाडे भरत नाहीत, त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई होईल असे इस्टेट विभागाने म्हटले आहे.