कारागृहात खळबळ ! कैद्याची आत्महत्या
schedule08 Sep 22 person by visibility 940 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
कळंबा मध्यवर्ती कारागृह मोक्का कारवाईखाली शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कापडी पट्टीने गळफास लावून आत्महत्या केली. भरत बाळासो घसघसे ( वय २९, रा. वाडकर गल्ली, आष्टा, जिल्हा सांगली) असे या मयत कैद्याचे नाव आहे.या घटनेने कारागृहात खळबळ उडाली आहे.
गुरुवारी पहाटे कळंबा कारागृहाच्या सर्कल क्रमांक सात येथील शौचालयाच्या भिंती लगत कापडी पट्टीने गळफास लावून घसघसे याने आत्महत्या केली. मोक्का कायद्याअंतर्गत 2019 पासून ते कारागृहात होते. या घटनेनंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली.