महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघातर्फेे राज्यातील वीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे सोमवारपासून (१२ ऑगस्ट) साखळी उपोषण सुरू केले.
वीज कंत्राटी कामगार लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहेत, सरकार लक्ष कधी देणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. ऊर्जांमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगाारांच्या मागण्यासंबंधी योग्य तोडगा काढावा. त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.
वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी या साठी बारा ते १७ ऑगस्ट या कालावधीत साखळी उपोषण होणार आहे. कोल्हापूर मधील महावितरण कार्यालय,ताराबाई पार्क येथे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमर लोहार, झोन अध्यक्ष राहुल भालभर व सचिव मिलिंद कुडतरकर , अनिल लांडगे, विजय कांबळे, यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सूर झाले आहे.या साखळी उपोषणाला संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री उमेश आनेराव व महाराष्ट्र प्रदेश उपमहामंत्री राहुल बोडके यांनी भेट देऊन कोल्हापूर मधील कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच
कोल्हापूर झोनच्या उपोषणाला विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी पाठींबा दिला आहे. वीस ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन होणार आहे. २४ ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानपर्यंत पायी मोर्चा आहे. शिवाय त्यांच्या घरासमोर संघटनेचे केंद्रीय उपमहामंत्री राहुल बोडके व त्यांच्या सोबत काही जिल्हा प्रतिनिधी बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.