नेमबाजी स्पर्धेत आदित्य साळोखेच्या सांघिक सुवर्ण
schedule27 May 23 person by visibility 171 categoryक्रीडा
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये १० मीटर एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत आदित्य अवधूत साळोखे, प्रतिक जोंग, सुमेध धनाजी यांनी शिवाजी विद्यापीठ संघाला सांघिक सुवर्णपदक पटकावून दिले. या २० वर्षीय युवकाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर साठी प्रतिक जोंग व सुमेध धनाजी यांच्या सोबत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. आदित्य हा लक्ष्य शुटींग क्लब मध्ये मागील वर्षापासून नियमित सराव करीत आहे,त्त्याला द्रोणाचार्य सुमा शिरूर मॅडम, सौ राधिका हवालदार,मुख्य प्रशिक्षक रमेश माळी, यांचे मार्गदर्शन लाभले, व डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ वि ए पाटील सर, शिवाजी विद्यापीठ चे कुलगुरू मा डॉ.डी.टी.शिर्के, क्रीडा संचालक डॉ शरद बनसोडे, मा विजय रोकडे यांचे सहकार्य लाभले.