Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्राचार्य डॉ. मानसिंगराव जगताप यांचे  निधनशिवाजी विद्यापीठाकडे पूर्ण वेळ कुलगुरू नियुक्ती करावी; शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .सुनील शिंत्रे आमदार शिवाजीराव पाटलांच्या उमेदवारांना गोकुळमध्ये आमची लोक मते देतील याची खाञी नाही – हसन मुश्रीफांचा पलटवारवारणा शिक्षण मंडळास पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता; पुणे विभागातील पहिले खासगी महाविद्यालयबार असोसिएशनच्या निवडणुकीत अॅड. राजेंद्र मंडलिक पॅनेलची बाजी, अॅड. प्रशांत चिटणीस पराभूतकोल्हापूर जिल्ह्यातील बारा पोलिस अधिकारी - कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्हगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा – चेअरमन नविद मुश्रीफगोकुळमध्ये मंत्री मुशीफांना सोडून युती करावी, अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा - आमदार शिवाजी पाटीलविवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे निधन बागेश्वर महाराजवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, कोल्हापुरात शिवभक्तांची मागणी

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाकडे पूर्ण वेळ कुलगुरू नियुक्ती करावी; शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा .सुनील शिंत्रे

schedule01 May 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :शिवाजी विद्यापीठ येथे पूर्णवेळ कुलगुरू नियुक्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनातून केली आहे. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आली.

न शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू पद गेल्या सात महिन्यापासून प्रभारी आहे. प्रभारी कुलगुरूंना महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यास काही कारणांनी विलंब होतो याचा विचार करून पूर्णवेळ कुलगुरूची नियुक्ती लवकरात लवकर व्हावी याकडे आपले लक्ष वेधत आहोत.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याच्या तरतुदीनुसार समिती गठीत केल्यापासून कुलगुरू नियुक्तीची शिफारस कुलपती कार्यालयास करण्यापर्यंतची सर्व कायदेशीर प्रक्रिया सद्या पुर्ण झाली आहे. सद्याच्या कायद्यानेच कुलगुरू पद रिक्त झाल्याने त्यातूनच कुलगुरूच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करावेत व तातडीने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पूर्णवेळ कुलगुरू नेमण्यात यावे अशी मागणी करीत आहोत. शिष्टमंडळात शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, शहरप्रमुख मंजित माने, राज झांबरे, महाळू करीकट्टे, अमर संकपाळ, मदन शिंदे  उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes