.लोहिया हायस्कूलची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत धडक
schedule27 Sep 23 person by visibility 210 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेमध्ये स.म.लोहिया हायस्कूल जुनियर कॉलेज संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम सामन्यात स.म.लोहियाने नाशिक संघाचा १-० असा पराभव केला. नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय हाॅकीस्पर्धेसाठी स.म.लोहिया संघाची निवड झाली आहे.
बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या पहिला सामन्यात स.म. स म लोहिया हायस्कूलने लातूर संघावर २-१ गोलने विजय मिळवला. उपान्त सामना मुंबई संघा सोबत झाला . हा सामना १-० गोलने जिंकून अतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना नाशिक विभागाबरोबर झाला. हा सामना १-० गोल जिंकून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी स.म.लोहिया हायस्कूल पात्र ठरला.
स्पर्धेतील विजयी संघ पुढीलप्रमाणे : सिद्धेश पटेल (कर्णधार ) , सोहम अनपट , स्वराज पोवार , सुहान शेख , हर्षवर्धन लवंगारे , पवन कदम , यश कांबळे , सोहम पाटील , आकाश पाटील , पृथ्वीराज चव्हाण , आदित्य मोहिते , यश असलकर , केदार जाधव , तेजस पाटील .
या संघास क्रीडाशिक्षक सचिन पुजारी,हॉकी प्रशिक्षक योगेश देशपांडे,सागर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तर
दि एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सल्लागार विनोदकुमार लोहिया, विद्यमान अध्यक्ष निर्मल लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर , संस्थेचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव प्राचार्य एस. एस. चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले .