Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आयुब हसन मुजावर यांचे निधनन्यू कॉलेज ऑफ फार्मसीचा उंचगावमध्ये स्वच्छता उपक्रमबँकॉकमधील हायरॉक्स स्पर्धेत कोल्हापूरच्या अक्षय मानेची दमदार कामगिरीआयुर्वेदाचार्य डॉ. सुनील पाटील यांचे निधनआता मुख्याध्यापक होणार माहितीतज्ञ ; यशदा - माध्यमिक शिक्षण विभागाचा विशेष कार्यक्रम  विनय प्रकाशदीपने उजळल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील वर्गखोल्याऑर्केस्ट्रा कलावंतांच्या जीवनावरील पुस्तक वेगळी अनुभूती देईलकेआयटीची अभिनव संकल्पना, कल्पनेपासून उद्योगापर्यंत! २१ ऑगस्टला एकदिवसीय कार्यशाळा ! !झंवर ग्रुपकडून विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरणप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक लाख ३६ हजार कुटुंबांचे आवास प्लस सर्व्हेक्षण, पंधरा ऑगस्टला ग्रामसभेत यादी मंजुरीची कार्यवाही

जाहिरात

 

वीरगाथा प्रोजेक्टचा विजेता फरहान मकानदारचे कोल्हापुरात स्वागत

schedule28 Jan 23 person by visibility 531 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संरक्षण मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त दिमाने घेण्यात आलेल्या वीरगाथा प्रोजेक्टचा विजेता व नॅशनल ॲकॅडमीचा विद्यार्थी फरहान मकानदार याचे शनिवारी कोल्हापुरात स्वागत करण्यात आले.
 प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथे २५ जानेवारी २०२३: रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते विद्यार्थी मकानदारचा गौरव करण्यात आला होता‌. मानचिन्ह व रोख दहा हजार रुपये बक्षीस देऊन त्याला गौरविले होते. फरहानचे शनिवारी दिल्लीहून कोल्हापूर आगमन झाले. दसरा चौक येथे त्याचे स्वागत करण्यात आले. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक अशी रॅली काढण्यात आली. नॅशनल अकॅडमी स्कूलचे चेअरमन हाजी असलम सय्यद व्हाईस चेअरमन राहीद खान, संचालक नासरखान आदींच्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघाली‌

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes