शिक्षक -पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, 23 ऑक्टोबरला मतदान
schedule22 Sep 26 person by visibility 85 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील पाच शिक्षक, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी करण्यात आली. निवडणूक आयोगाने राज्याील पाच शिक्षक, पदवीधर निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये अमरावती, पुणे , नागपूर, औरंगाबाद विभागाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबर 2026 रोजी रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 27 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. दरम्यान सहा ऑक्टोबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे तर 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. नऊ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघांमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदार संघासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.