Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळा

schedule21 Sep 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन २४ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित केले आहे. या सोहळयात ३८ शिक्षकांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी ४ वाजता हॉटेल सयाजी येथे हा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. असोसिएशनच्या पुरस्कारसाठी विविध जिल्ह्यांमधून शिक्षक व मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने प्रस्ताव दाखल केले होते. छाननी व मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली.शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण कार्याची समाजाने दखल घ्यावी, त्यांच्या योगदानाला योग्य व्यासपीठ मिळावे आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कार्यक्रम आयोजित केला आहे. पत्रकार परिषदेला असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेश पोळ, राज्याध्यक्ष गणेश नायकुडे, उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव नितीन पाटील, सहसचिव विल्सन वास्कर, कोल्हापूर शहर अध्यक्ष अमर सरनाईक,  सचिन नाईक, दत्तात्रय रणदिवे, उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes