Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडे

जाहिरात

 

कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कारांनी सन्मानित करा, खाटिक समाजाची राज्य सरकारकडे मागणी

schedule28 Jul 20 person by visibility 3896 categoryसंपादकीय

 महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेला सन्मानित करावे अशी मागणी खाटिक समाजाने केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री सतेज पाटील यांना ईमेलद्वारे या मागण्यांचे निवेदन पाठविले आहे.

सिनेमा पोस्टरच्या दुनियेतील सम्राट म्हणून जी. कांबळे यांची ओळख आहे. भारतीय सिनेमा पोस्टरमध्ये जी कलात्मकता व भव्यता दिसते त्याचा पाया कलायोगींनी घातला. दिल्लीत १९६० मध्ये ‘मुगले आझम’सिनेमाची जी. कांबळे यांनी रेखाटलेली भव्य पोस्टर पेटिंग पाहून इंग्लडच्या राणी एलिझाबेथ यांनी आपल्या स्वागताची मिरवणूक काही वेळ थांबवली होती. पोस्टर पेटिंग पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या होत्या. कलायोगी जी कांबळे यांनी पोस्टर पेंटिगला अभिजात कलेसारखा दर्जा मिळवून दिला. त्यांनी महापुरुषांची व्यक्तीचित्रे रेखाटली. सतत पाच वर्षे अभ्यासपूर्वक बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला सरकारची अधिकृत चित्र म्हणून राज्यमान्यता मिळाली.

कलायोगी जी. कांबळे यांच्या कलेची क्षेत्रातील कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारने त्यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी समाजाने केली आहे. खाटिक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव संजय भोपळे, अखिल भारतीय खाटिक समाज कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष विजय कांबळे यांनी या मागणीचे निवेदन मेल केले आहे.


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes