कौन्सिल ऑफ एज्युकेशनतर्फे स्वच्छता अभियान
schedule02 Oct 24 person by visibility 145 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ( दि .२ ऑक्टोबर ) कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचालित शहाजी लॉ कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स , नाइट कॉलेज आणि पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या वतीने रत्नाप्पा कुंभार नगर ( आर के नगर ' येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खडीच्या गणपतीपासून आर के नगर सोसायट्यांमधील वसाहती, बाजारपेठ,रस्ते, चौक येथे स्वच्छता स्वच्छता करण्यात आली . आरकेनगर नाका येथील कोंडाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा होता. हा परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. तसेच या परिसरामध्ये श्रमदान करून परिसर स्वच्छ व कचरामुक्त करण्यात आला . यासाठी रत्नाप्पा कुंभारनगर हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुनील वंदुरे पाटील, ग्रामपंचायत पाचगाव व मोरेवाडी तसेच या परिसरातील नागरिक यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले .
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ विश्वनाथ मगदूम यांनी महात्मा गांधींचे विचार व कार्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले. स्वच्छता मोहिमेचा उद्देश सांगितला. गतवर्षीपासून कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या महाविद्यालयांच्यावतीने आर के नगर परिसरात स्वच्छता व प्रबोधन केले जाते. यंदा सुमारे पाचशे विद्यार्थी, एनसीसी, एनएसएसचे स्वयंसेवक, प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.
कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनी मगदूम, सचिव डॉ विश्वनाथ मगदूम यांच्या पुढाकाराने ही स्वच्छता मोहीम झाली. डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ . आर एस नाईक, नाइट कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ . एस जे फराकटे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ कुलकर्णी आदी उपस्थित होते .
"महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवून स्वच्छतेचे महत्व लोकमानसात रुजवण्याचा प्रयत्न करणार आहोत ", असे डॉ मगदूम यांनी सांगितले.