सांगोलानजीक अपघात, नांदणीचे दोघे ठार
schedule07 Oct 24 person by visibility 244 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देवदर्शन करुन परत येत असताना झालेल्या अपघातामध्ये नांदणी येथील दोघे ठार झाले. सोमवारी, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोलापूर-सांगली महामार्गावरील सांगोला तालुक्यातील चिंचोली बायपासजवळ कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तिघे जण जखमी आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव आणि नांदणी येथील पाच मित्र कारने देवदर्शनासाठी तुळजापूरला गेले होते. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन ते सोमवारी पहाटे गावाकडे परत येत होते. सांगोला तालुक्यातील चिंचोली बायपास जवळ कारने, सोळा चाकी मालवाहतूक ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये कारमधील नांदणीचे नैनेश कोरे व सुखदेव बामणे हे दोघेही ठार झाले. तर वडगाव येथील सुधीर चौगुले, अनिल शिवानंद कोरे (नांदणी) व सुरज विभुते (कोठली) हे तिघे जखमी आहेत. जखमीवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.