Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक - पदवीधर मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू, प्रत्यक्ष मतमोजणी संध्याकाळनंतरचजीतो कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी राजीव परिख; सचिवपदी रविंद्र देवमारेदुष्काळग्रस्त तालुक्यातील दहावी- बारावी परीक्षार्थींचे शुल्क पूर्णतः माफएआयची साथ मिळाल्याने उपचार पद्धतीत अचूकता- संभाव्य धोके ओळखण्याची क्षमता वाढली सर, तुम्ही सुद्धा...!निवडणुकीपूर्वी ठरावधारकांची सहल, निकालानंतर संचालकांची टूर ! दोन्ही आघाडयांकडून नियोजन !!इकोबाजार, पर्यावरणपूरक उत्पादनांचे प्रदर्शनमतदानाचा टक्का वाढला ! शिक्षकसाठी ८५.८७ टक्के, पदवीधरसाठी ६२.७८ टक्के !! नवीन आमदार कोण ?सायबर महाविद्यालयात यंदा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हलशिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवात डीवाय पाटील अभियांत्रिकीचे विद्यार्थी चमकले 

जाहिरात

 

शिक्षक - पदवीधर मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करण्याचे काम सुरू, प्रत्यक्ष मतमोजणी संध्याकाळनंतरच

schedule27 Oct 26 person by visibility 119 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी:  पुणे विभागीय पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे दोन्ही मतदारसंघातील मतपत्रिकांचे पहिल्यांदा गठ्ठे तयार करण्यात येणार आहेत 50 - 50 चे गठ्ठे तयार केले जातील. पुणे मतदारसंघात कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे मतपत्रिकांचे ५०-५० चे गठ्ठे 
तयार करण्याचे काम मंगळवारी (27 ऑक्टोबर 2026) दुपारी चार वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे. दोन्ही मतदारसंघातील मतपत्रिकांचे गट्टे तयार झाल्यानंतर पात्र, अपात्र मतपत्रिकांचं वर्गीकरण केले जाईल. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. यंदा झालेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये 47 उमेदवार रिंगणात होते तर शिक्षक मतदारसंघांमध्ये 30 उमेदवारांनी नशीब आजमावले आहे. शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघासाठी यंदा चुरशीने मतदान झाले आहे.या मतपत्रिकेंचे वर्गीकरण केल्यानंतर पात्र  मतपत्रिकाच्या नुसार विजयासाठीचा कोटा निश्चित केला जातो. विजयासाठीचा कोटा निश्चिती केल्यानंतर मतपत्रिकांचे उमेदवारनिहाय वर्गीकरण होईल. मतपत्रिकेचे उमेदवार निहाय वर्गीकरण झाले की प्रत्यक्ष
 मतमोजणीस सुरुवात होईल. शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीत जर कोणत्याही उमेदवारांनी निश्चित कोटा आकडा गाठला तर निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होऊ शकतो.
 दरम्यान कोणत्याही उमेदवारांनी पहिल्या फेरीत विजय कोटा घातले नाहीत तर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. त्यातील मतांचे बलाबल पाहून  निकाल बुधवारी 28 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर होऊ शकतो. महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेनेच्या उमेदवारासह अपक्ष मोठ्या संख्येने रिंगणात आहेत

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes