विद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली कुलगुरुंची भेट
schedule09 Jun 26 person by visibility 9 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. आर. के. कामत आणि प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांचे विद्यापीठ विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. तसेच त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ विकास आघाडीचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते कुलगुरू कामत व प्रकुलगुरू जाधव यांचे स्वागत झाले. विद्यापीठ विकास आघाडीचे भैय्या माने, प्राचार्य डी. आर. मोरे, डॉ. मंजिरी मोरे, के. एस. चौगले, प्रताप पाटील,अनिल कुराडे, अभिजीत कापसे, संजय जाधव, विनोद पंडित आदी उपस्थित होते. याप्रसंगी झालेल्या चर्चेत विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा, संशोधन, विद्यार्थ्यांची संख्या वाढीसाठी सर्व घटकांनी काम करण्याची गरज असल्याचे मत साऱ्यांनी व्यक्त केले. डॉ. संजय पाटील यांनी, ‘विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना, शैक्षणिक संशोधनात्मक कामांना विद्यापीठ विकास आघााडीचे नेहमी पाठबळ राहील’असे आश्वस्त केले. कुलगुरू कामत यांनी, ‘कुलगुरु म्हणून काम करताना विद्यापीठाच्या विकासासाठी साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका आहे.’असे स्पष्ट केले. डॉ. मेघा गुळवणी यांनी आभार मानले.