Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
संजय भोसलेंचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून नामंजूर, आयुक्तांनी निलंबित करावे – भूपाल शेटेटाकाऊतून टिकाऊ, भंगारातील गाडयांचे ट्रकमध्ये रुपांतर ! कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला आयुक्तांची शाबासकी ! !काँग्रेसचे नगरसेवक धावले पंपिंग स्टेशनकडे, आयुक्त अधिकाऱ्यांकडूनही पाहणीपाण्याच्या उपलब्धतेच्या ठिकाणांवरील उपसाबंदी उठवावी, इरिगेशन फेडरेशनची मागणीटिक टिक वाजते डोक्यात… उलगडले घडयाळाशी जुळलेले बंध ! प्रकटला राजकारणापलीकडील कृतज्ञतेचा भाव !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ, २६६ खेळाडूंचा सहभागटीईटी परीक्षेसाठी शिक्षण विभाग सज्ज, शहरातील ५४ केंद्रावर ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीज्युनिअर कॉलेजच्या संचमान्यतेवरुन आमदारांचा हल्लाबोल ! शिक्षण आयुक्त हटवा...शिक्षण क्षेत्र वाचवा !!उत्साह, स्वागत - नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा  वाजली !  प्रवेशोत्सवासह नशामुक्त कोल्हापूरची शपथ !! चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले, उपाध्यक्षपदी धनाजी यमकर, आनंद शिंदे

जाहिरात

 

सरकारी कंत्राटदारांचे रविवारी कोल्हापुरात महाअधिवेशन ! थकित बिलाचा विषय ऐरणीवर, फेडरेशनची स्थापना होणार !!

schedule09 Jun 26 person by visibility 315 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : महाराष्ट्र स्टेट गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर फेडरेशनचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (14 जून 2026 ) कोल्हापुरात होत आहे. या महाअधिवेशनामध्ये सरकारी कामांच्या कंत्राटदारांच्या विविध समस्या,  सरकारची धोरणे, विकासकामांमध्ये संधी तसेच फेडरेशनच्या भावी वाटचाली संदर्भात चर्चा होणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे महाअधिवेशन होणार असल्याची माहिती बापू लाड, सुनील नागराळे, किशोर जामदार, विजयसिंह सावंत,  प्रदीप पाटील,  यांनी पत्रकार परिषदेत दिली
 या अधिवेशनामध्ये संघटना बांधणी मार्गदर्शन, सार्वजनिक बांधकाम,  पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास विभाग, जलसंपदा व जलसंधारण विभाग नगर विकास विभाग यासह विविध विभागांचे प्रश्न, आंदोलनाची दिशा व संघटनेचे ठराव निश्चित केले जाणार आहेत. सरकारकडे  विविध विभागातील मिळून विकासकामे केलेली तब्बल  88 हजार कोटी रुपयांची कंत्राटदारांची बिले थकीत  आहेत. सरकारने वेळेवर थकीत बिले न दिल्यामुळे कंत्राटदारांची  अवस्था बिकट होत आहे. अनेक कंत्राटदारानी बँकेतून कर्ज काढून व्यवसायामध्ये रक्कम गुंतवले आहे. मात्र केलेल्या कामाचे बिल मुदतीत न मिळाल्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. या महाअधिवेशनामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. राज्यभरातील 30 जिल्ह्यातून जवळपास 1000 प्रतिनिधी या महाअधिवेशनात सामील होणार आहेत. सरकारला संघटनात्मकरित्या ताकद दाखविण्याचा आणि सरकारी कंत्रांटदारांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी हे अधिवेशन उपयुक्त ठरेल असे लाड  व नागराळे यांनी सांगितले. " थकित बिले तत्काळ व पूर्णपणे द्यावेत,  ई टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता आणावी, कंत्राटदार विरोधी नियम व अटी रद्द करावे, जीएसटी भरपाईचा लाभ तत्काळ मिळावा, किमान दर्जाच्या कामासाठी कंञाट रक्कम कपात थांबवावी, कंत्राटदाराना सन्मान व न्याय मिळाला पाहिजे ' अशा विविध विषयासंबंधी आंदोलनाची दिशा महाअधिवेशनात निश्चित केली जाईल असे विजय सावंत व प्रदीप पाटील यांनी सांगितले. या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष राजू कृष्णानी, महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार  संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे महासचिव एम ए हकीम, महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियंता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप मेदगे, कंत्राटदार कौशिक देशमुख, संजय मैद, सुबोध सरोदे, प्रवीण उंबरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनासाठी कोल्हापूर जिल्हा गव्हर्मेंट कॉन्टॅक्टर असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघ, कोल्हापूर जिल्हा शासकीय मटेरियल पुरवठा संघटना,  सार्वजनिक बांधकाम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, कोल्हापूर कोल्हापूर व सांगली हॉट मिक्स प्लांट असोसिएशन,  सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना आदी संघटना सहभागी होणार आहेत.पत्रकार परिषदेला जे.के. पाटील,  किशोर संजय पाटील,सोहम दळवी, बी एस पाटील आधी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes