Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिका- कोल्हापूर फर्स्ट एकत्र काम करणारवडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवासकोल्हापूरच्या मातीने मला संस्कार दिले, पुरस्काराने मातीचे ऋण फेडण्याची जाणीव - गायिका श्रृती सडोलीकर - काटकरआमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध उपक्रमरामशेठ ठाकुरांनी दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला पंचवीस लाखाची देणगीमहात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळीजिल्हातंर्गत काँग्रेसमध्ये होणार फेरबदल, पदाधिकारी नेमणुकीसंदर्भात आढावा बैठकडॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील माने

जाहिरात

 

वडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवास

schedule12 Apr 26 person by visibility 19 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘वैद्यराज डॉ. सुनिल बी. पाटील यांच्या वडणग्याचं पोरगं : आत्मकथनातून उलगडलेला संघर्ष-समाजभान-मूल्यनिष्ठेचा प्रवास आहे.’अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

प्रा. डॉ. रावसाहेब पाटील, डॉ. श्रीमंत कोकाटे आणि वडणगे गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील यांच्या हस्ते ‘वैद्यराज डॉ. सुनिल बी. पाटील यांच्या ‘वडणग्याचं पोरगं’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा नुकताच झाला. प्रा. डॉ. डी. डी. काचोळे अध्यक्षस्थानी होते. चेतना विकास मंदिर येथे हा कार्यक्रम झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. कोकाटे यांनी, ‘वैयक्तिक जीवनप्रवासाचे प्रांजळ आत्मकथन करताना सामाजिक वास्तवाचे भान जपणारी ही साहित्यकृती, चिंतनाची एक नवी दिशा निर्माण करणारी आहे.’असे नमूद केले. प्रा. पाटील यांनी आत्मचरित्रातील संघर्षाचा आशय अधोरेखित करत, ते अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले.प्रा. काचोळे यांनी या आत्मचरित्रात समकालीन समाजाचे प्रतिबिंब दिसून येते.अशा प्रकारचे आत्मकथन साहित्यदृष्ट्या महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले.

‘वडणग्याचं पोरगं’ हे आत्मचरित्र वैयक्तिक अनुभवांचे केवळ कथन न राहता, ते व्यापक सामाजिक संदर्भात अर्थपूर्ण ठरते. प्रांजळता, संवेदनशीलता आणि मूल्यनिष्ठा यांच्या आधारे उभे राहिलेले हे लेखन वाचकाला अंतर्मुख करते आणि आत्मपरीक्षणाची दिशा सुचवते. अशा प्रकारची आत्मकथने समकालीन मराठी साहित्यात विचारप्रवर्तक भर घालणारी ठरतात असे मान्यवरांनी सांगितले.  प्रकाशिका सुजाता पाटील यांनी ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा आणि आत्मकथनाच्या प्रक्रियेतला भावनिक व बौद्धिक प्रवास अधोरेखित  केला. डॉ. ऋषिकेश जाधव यांनी स्वागत केले. डॉ. शरयू पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. स्नेहल पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes