Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

डॉ. बापूजी साळुंखे  इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये उलगडली भारतीय वायुदलातील करिअरची संधी  

schedule11 Apr 26 person by visibility 223 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : " भारतीय वायुदलामध्ये  इंजिनिअर्सना  विविध  तांत्रिक,  अतांत्रिक  आणि  कार्यालयीन पदांच्या  आकर्षक   करिअर संधी  उपलब्ध असून  वर्षभर वायुदलातर्फे विविध  भरती प्रक्रिया  आयोजित केल्या जातात . इंजिनिअर्सचा तंत्रज्ञान  तसेच गणित व भौतिकशास्त्रातील  अभ्यास  उत्तम असल्याने  देशसेवेची संधी देणाऱ्या वायुदलातील  करिअरकडे विद्यार्थ्यांनी वळावे "  असे प्रतिपादन फ्लाईट लेफ्टनंट गुरजीत सिंग बुलार यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे 'भारतीय वायुदलातील करिअर संधी ' या विषयावर त्यांनी सविस्तर  मार्गदर्शन केले. 
फ्लाईट लेफ्टनंट गुरजीत सिंग बुलार यांनी  भारतीय वायुदलाचा गौरवपूर्ण इतिहास , वायुदलाकडून होणारी संरक्षण सेवा  तसेच विविध  मदतकार्ये  , लढाऊ विमाने ,  हेलिकॉप्टर्स यांची माहिती देऊन  त्या अनुषंगाने उपलब्ध  संधींचा ऊहापोह केला . ते म्हणाले , " फ्लाईंग ब्रँचबरोबरच  टेक्निकल ग्राउंड ड्युटी मध्ये  रडार ,मिसाईल,  नेटवर्क,  आयटी,   सायबर सिक्युरिटी अशा विविध  तांत्रिक विभागांसाठी  तसेच  लॉजिस्टिक्ससाठी  मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, एरोस्पेस, एरोनॉटिकल  अशा विविध  इंजिनिअरिंग शाखांमधील  अभियंत्यांची गरज असते.  एनडीए , यूपीएससी, एनसीसी स्पेशल एन्ट्री  तसेच एअर फोर्स  कॉमन ऍडमिशन टेस्ट  या चार  मार्गांद्वारे  वायुदलामध्ये भरती होता येते . इंजिनिअरिंग पदवीमध्ये  किमान साठ टक्के गुणप्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वायुदलामध्ये भरती  होता येते.
या कार्यक्रमासाठी
  संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या  शुभांगी गावडे , संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे  मार्गदर्शन मिळाले. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ . सुहास सपाटे  सपाटे यांनी  प्रास्ताविक केले .  संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक  प्राचार्य  विरेन भिर्डी यांनी आभार मानले.  कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. राजेंद्र भोसले  यांनी नियोजन केले.  प्रा. आरती  चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes