Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास सर्किट बेंचचा नकारअजीम नवाज राही यांना रत्नाकर काव्य पुरस्कारकुलगुरू नियुक्तीला दिरंगाई, सिनेट सदस्यांचे राज्यपालाना पत्र ! लाठया खाऊ, जेलमध्ये जाऊ पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! नऊ जूनला कोल्हापुरात महामोर्चा !!डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेजची महिमा शिर्के बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीयई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवास

जाहिरात

 

महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म हा मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा - प्राचार्य जी. पी. माळी

schedule11 Apr 26 person by visibility 153 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : ‘महात्मा फुले यांनी स्थापन केलेला सार्वजनिक सत्यधर्म हा सामाजिक समतेच्या तत्त्वावर आधारलेला आहे. तो आचरण्यास विधायक सुलभ आहे. धार्मिक सहिष्णूता, मानवी प्रतिष्ठा  मानवी समानता ही मूल्ये समाजात रुजविण्यासाठीच जोतीरावांनी या सार्वजनिक सत्यधर्माची निर्मिती केली होती. फुलेंचा हासार्वजनिक सत्यधर्मम्हणजे मानवी मुक्तीचा जाहीरनामा आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी केले.

 शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्रातंर्गत फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहांतर्गत महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजितमहात्मा फुले यांचा मानवतावादी सत्यधर्मया विषयावरील व्याखानामध्ये बोलत होते. प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख अध्यक्षस्थानी होते.

प्राचार्य माळी म्हणाले, ‘महात्मा फुलेंनी त्यांच्या सत्यधर्मामध्ये ईश्वर हा निर्मिकाच्या स्वरूपात स्वीकारला परंतु; कल्पोकाल्पित देवता त्यांची मूर्तीपूजा, व्रतवैकल्य, प्रारब्ध, संचित, स्वर्ग-नर्क, सत्यनारायण, नशीब, यासारख्या थोतांड गोष्टी नाकारल्या. त्याऐवजी त्यांनी आत्मपरीक्षण बुद्धीप्रमाण्यावाद स्वीकारला. तो बुद्धीप्रमाण्यावाद त्यांनी स्वकृतीतून आचरणात आणला. उस्मान शेख यांनी जोतीरावांना प्रौढांची शाळा सुरु करण्यासाठी जागा दिलेली होती,’

डॉ.देशमुख म्हणाले, महात्मा फुले हे समतेचे अग्रदूत होते. ‘शेतकऱ्यांचा आसूडया ग्रंथाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवून त्यांची मुक्ती झाली पाहिजे असा आग्रह धरला. यावेळी प्रा. डॉ. प्रल्हाद माने यांचे मनोगत झालेडॉ. विद्यानंद खंडागळे यांनी प्रास्ताविक केलेव्याख्यानास प्राचार्य डॉ. हरीश भालेराव, डॉ. चेतना सोनकांबळे, प्रा. अविनाश भाले, आनंदराव खामकर, डॉ. आर. एम. गरुड, डॉ. एम. के. भानारकर, प्रकाश श्रावस्ती, दीपक शिंदे, डॉ. किशोर खिलारे, गणेश कांबळे, प्रा. प्रियांका जाधववर, मिलिंद सुरुळकर, उदय पोवार, सुशांत पंडित, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते. समीर होवाळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार  मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes