Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ग्रामीण भागांशी जोडलेलं, अनुभवी नेतृत्व ! रामचंद्र भोगमांची उमेदवारी दूध उत्पादकांना वाटतेय आपली !!मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलनशेतकऱ्यांचा आवाज गोकुळमध्ये उमटणार, समविचारीतून बाबासाहेब देवकरांच्या उमेदवारीला उत्पादकांची पसंतीके.जी. पाटील यांना पत्नीशोकगोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप

जाहिरात

 

मराठी अध्यापक संघातर्फे दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन

schedule01 Oct 26 person by visibility 25 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :   अभिजात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे तीन व चार ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शिक्षक साहित्य संमेलन आयोजित केले आहे. राम गणेश गडकरी सभागृह येथे हे संमेलन होणार आहे.

शनिवारी, तीन ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात होईल. सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन आहे. साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे हे उद्घाटन सोहळयाचे अध्यक्ष आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सहसचिव सुर्यकांत चव्हाण, प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे. उद्घाटन सोहळयानंतर ‘मराठी भाषा : वर्तमान, आव्हाने आणि भविष्य’या विषयावर परिसंवाद आहे.

शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखालील या सत्रात मुंबई येथील डॉ. दीपक पवार व कुडाळ येथील प्रकाश परब हे मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी कथाकथन व त्यानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. रविवारी, चार ऑक्टोबर रोजी कवी संमेलन होणार आहे. त्यानंतर ‘गझल कट्टा’ कार्यक्रम आयोजित केला आहे. दुसऱ्या सत्रात ‘सुंदर माझी शाळा’ हा कवितांचा कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचा समारोप दुपारी तीन वाजता होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes