Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!समविचारी आघाडी सत्तेवर आल्यास कात्यायनी परिसरात अत्याधुनिक म्हैस खरेदी केंद्र उभारणार - आमदार सतेज पाटीलअभाविपचे विद्यापीठात आंदोलन, सुरक्षारक्षकांशी झटापटयुवराज संभाजीराजे, आमदार विनय कोरे, अमल महाडिकांना कुस्ती पोशिंदा पुरस्कार, शुक्रवारी कार्यक्रमाचे आयोजनधम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी धम्मविचार साहित्य संमेलनडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपविकसित कोल्हापूर २०४७ साठी राज्यपालांकडे कोल्हापूर फर्स्टची भूमिकाभागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रद्द, बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीलाघरगुती - व्यावसायिक वापराच्या साखरेसाठी वेगवेगळे दर आवश्यक -आमदार अमल महाडिकलग्न ठरवायला मुंबईला गेले अन् मुख्यमंत्री नागपूरला अशी विरोधकांची अवस्था - सतेज पाटलांचा महायुतीला टोला

जाहिरात

 

गोकुळच्या जागा पंचवीस, मागणी 29 ची ! महायुतीची मुंबईतील चर्चा निष्फळ, दोन दिवसांनी निर्णय !!

schedule01 Oct 26 person by visibility 72 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जागा वाटप संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये महायुतीच्या नेते मंडळींची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दहा, भारतीय जनता पक्षाने आठ,  शिवसेनेने आठ तर जनसुराज्यशक्ती पक्षाने तीन जागांची मागणी केली. गोकुळच्या संचालक पदाच्या एकूण 25 जागा आहेत. मात्र घटक पक्षाने मागणी केलेल्या जागांची संख्या 29 पर्यंत गेली. त्यामुळे बैठकीत जागावाटपा संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही. या बैठकीत महायुतीतील नेते मंडळीनी आपआपल्या अपेक्षित जागा सांगितल्या. आता मुख्यमंत्री  यासंदर्भात निर्णय घेणार आहेत.
सध्या गोकुळ निवडणुकीची धामधूम सुरू आहे. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. मात्र जिल्हा पातळीवर झालेल्या बैठकीत महायुतीतील नेते मंडळींची जागा पाठवा संदर्भात एकमत झाले नाही. जागा वाटपा संबंधी बुधवारी मुंबईत बैठक आयोजित केली होती.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा  निवासस्थानी महायुतीच्या नेते मंडळींची बैठक  झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंत्री हसन मुश्रीफ यांनी दहा जागा मागितल्या. मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपसाठी आठ जागांचा प्रस्ताव ठेवला तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शिवसेनेला आठ जागा हव्यात असे सांगितले. या बैठकीत  कोणी किती जागा लढवायच्या या संदर्भात एकमत होऊ शकले नाही त्यामुळे आता पुन्हा बैठक होणार आहे आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार आहेत दरम्यान मुंबईतील बैठकीला आमदार अमल महाडिक, माजी आमदार के पी पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes